शेतीशिवार टीम, 2 जानेवारी 2022 : PM Kisan Sanman Nidhi sceme : PM किसान सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता (10th installment) जारी करण्यात आला आहे. पंतप्रधानांनी काल 10 कोटी 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 20,946,77,28,000 कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत.

ही रक्कमही बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. परंतु असे असूनही, जर तुमच्या खात्यात रक्कम पोहोचली नसेल, तर तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावर तक्रार करू शकता आणि कारण जाणून घेऊ शकता…

यादीत नाव नसल्यास ‘या’ क्रमांकावर करा तक्रार :-

अनेक लोकांची नावे आधीच्या यादीत होती, पण ती नवीन यादीत नसल्यास, तुम्ही पीएम किसान सन्मानच्या हेल्पलाइन नंबरवर तक्रार नोंदवू शकता. यासाठी तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 011-24300606 वर कॉल करू शकता.

याप्रमाणे तुम्ही मंत्रालयाशी संपर्क साधू शकता..

पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक : 155261
पीएम किसान लँडलाइन क्रमांक : ०११-२३३८१०९२, २३३८२४०१
पीएम किसानची नवीन हेल्पलाइन : 011-24300606
पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे : ०१२०-६०२५१०९
ई-मेल आयडी : pmkisan-ict@gov.in

ऑनलाइन यादी या सोप्या स्टेप्स करा फॉलो…

pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.
होम पेजवरील मेनूबारवर जा आणि ‘Farmer’s Corner’ वर जा.
येथे ‘लाभार्थी यादी’ या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर तुमचं राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव तपशील प्रविष्ट करा.
हे भरल्यानंतर Get Report वर क्लिक करा आणि संपूर्ण लिस्ट पहा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *