तुमच्या मुलीसाठी रोज फक्त 121 रु. वाचवा ; लग्नाच्या वेळी एकरकमी मिळतील 27 लाख, जाणून घ्या कसे ?
शेतीशिवार टीम, 2 जानेवारी 2022 : जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी नवीन वर्षात गुंतवणुक करण्याचं नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आयुर्विमा महामंडळाची (LIC) कन्यादान पॉलिसी ही मुलींसाठी अतिशय लोकप्रिय योजना आहे.
या योजनेचा उद्देश मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पालकांना बचतीचे साधन उपलब्ध करून देणे हा आहे, म्हणून या पॉलिसीला एलआयसीने (LIC) कन्यादान पॉलिसी असं नाव दिले आहे. तुम्ही ही खास एलआयसी पॉलिसी (LIC policy) घेतल्यास, तुम्हाला मुलीच्या लग्नाची काळजी करण्याची ही गरज नाही. आज आपण याच LIC च्या या खास पॉलिसीबद्दल जाणून घेउयात…
या पॉलिसी वेळी मुलीचं वय किती असावं ?
यासाठी मुलीचे वय 1 वर्ष आणि पालकांचे किमान वय 30 वर्षे असावं. ही योजना 25 वर्षांची असेल परंतु तुम्हाला 22 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. ही पॉलिसी मुलीच्या वयानुसार वेगवेगळ्या कालावधीसाठी उपलब्ध आहे परंतु यामुळे पॉलिसी मर्यादा कमी होईल आणि प्रीमियम वाढेल.
तसेच पॉलिसी घेतल्यानंतर पॉलिसीधारकाचा मृत्यू कोणत्याही कारणाने झाल्यास, कुटुंबाला उर्वरित प्रीमियम भरावा लागणार नाही. अपघाती निधन झाल्यास कुटुंबाला 10 लाख रुपयांची एकरकमी रक्कम मिळू शकते.आकस्मिक निधन झाल्यास कुटुंबाला 5 लाख रुपये मिळतील. कुटुंबाला परिपक्व (Maturity) होईपर्यंत प्रतिवर्ष 50,000 रुपये मिळतील.
आवश्यक कागदपत्रांबद्दल जाणून घ्या…
आधार कार्ड,
उत्पन्नाचा पुरावा,
ओळखीचा पुरावा,
पत्त्याचा पुरावा
पासपोर्ट आकाराचे फोटो
स्वाक्षरी केलेला अर्ज
पहिल्या प्रीमियमसाठी चेक किंवा रोख रक्कम
जन्म प्रमाणपत्र
तुम्हाला किती पैसे भरावे लागतील :-
एलआयसीच्या (LIC) कन्यादान पॉलिसीमध्ये तुम्हाला दररोज 121 रुपये किंवा दरमहा 3600 रुपये जमा करावे लागतील. हा प्रीमियम पूर्ण केल्यावर, तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नासाठी 27 लाख रुपये मिळतील.