पुरंदर तालुक्यातील युवकांनी एकत्र येत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या आणि पुरंदरची ओळख असलेल्या अंजीर आणि | सीताफळाचा नावलौकिक | सातासमुद्रापार पोहोचविला आहे. पुरंदर हायलॅण्ड शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे . यामध्ये 40 शेतकरी सभासद झाले आहेत. तर 14 संचालक आहे.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सिताफळाचे संकलन हंगामात सिंगापूर गावच्या हद्दीत सुरू असते तेथे खरेदी केली जाते प्रत्येक फळाचे वजन केले जाते त्यामुळे त्याचे ग्रेडिंग आणि पॅकिंग केले जाते. प्रतवारीनुसार तात्काळ शेतकऱ्यांना रक्कम दिली जाते शेतकऱ्यांना सलग पंधरा दिवस एकाच भावानुसार पैसे दिले जातात त्यामुळे शेतकरी जास्तीत जास्त माल विक्रीला पाठवतात.
शेतकरी उत्पादक कंपनी च्या माध्यमातून अमेझॉन फ्रेश, सह्याद्री फार्म, नामधारी, स्टार बाजार, किसान कनेक्ट यासह इतर कंपन्या अंजीर आणि सीताफळाचा पुरवठा केला जातो.
दरम्यान, दिल्ली, कोलकत्ता, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा, हैदराबाद, कर्नाटक, केरळ, कोचीन, बेंगलोर,म्हैसूर, चेन्नई, या ठिकाणी तसेच महाराष्ट्रातील पुणे, मुंबई आणि नागपूर मध्ये मालाचा पुरवठा केला जात आहे.
अंजीर आणि सिताफळाचे पुरंदर तालुकाशिवाय जगात इतर कुठेही उच्च दर्जाचे उत्पादन होत नाही. त्यामुळे त्यावर प्रक्रिया करून चांगले भाव मिळतील या हेतूने अंजीर, सीताफळ, आणि पेरू यांना जगाच्या बाजारपेठेत पोहचवणार असल्याचा विश्वास सिंगापूर शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष रोहन उरसळ यांनी व्यक्त केला.
प्रोड्युसर कंपनीत 14 संचालक असून त्यातील प्रत्येकाला विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. त्यानुसार कंपनीचे काम सुरू आहे रोहन उरसळ अध्यक्ष आहेत तर अतुल कडलग, रामचंद्र खेडेकर, गणेश कोलते, समिल इंगळे, संपत खेडेकर, सागर लवांडे, सागर धुमाळ, दीपक जगताप, नितीन इंगळे, बापू शेलार, आदित्य कोते, ज्ञानेश्वर फडतरे यांचा संचालक मंडळात समावेश आहे. पुरंदर हायलँड कंपनी ही 24 जानेवारी 2019 पासून काम करताहेत. यापूर्वीही 2 वर्षांपासून शेतकरी गट म्हणून काम सुरू केले होते.
अंजीर हे एक अथवा दोन दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही मात्र त्यावर विविध प्रक्रिया केल्यामुळे आता ते पंधरा दिवस टिकते त्यामुळे आता अंजीर प्रक्रिया उद्योगावर काम सुरू केले असून ते नुकतेच जर्मनीला पाठवले आहे. अंजीर आणि सिताफळाचे प्रोसेसिंग युनिट सुरू केले आहे. अंजीर स्प्रेड, रत्नदीप पेरू स्प्रेड तयार करण्यात आले आहे. तसेच येत्या सहा महिन्यांमध्ये आणखी तीन नवीन उत्पादने तयार करण्यात येणार असून या माध्यमातून जगातील बाजारपेठांमध्ये पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट असल्याचे उरसळ यांनी सांगितले.
प्रोड्युसर कंपनीची टप्प्याटप्प्याने प्रगती सुरू आहे. आतापर्यंत शासनाकडून कसल्याही प्रकारचे अनुदान घेतले नाही सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित प्रक्रिया उद्योग सुरू केले असून त्यासाठी सर्वांनी झोकून दिले आहे.
दरम्यान या कंपनीच्या यशामध्ये माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. रोहन उरसळ यांनी पवार यांच्याकडे ही संकल्पना मांडली त्या वेळी पवार यांनी यांना देशपातळीवरील तर आंतरराष्ट्रीय स्तरावर तज्ञांची भेट घालून दिली. तसेच वेळोवेळी आढावा घ्यायचे, अडचणी सोडवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले
पुरंदर तालुका हा सीताफळ आणि अंजिराच्या आधार आगार मानला जातो. येथे उत्पादित होणारी ही फळे जगतात कोठेही इतक्या उच्च दर्जाचे उत्पादित होत नाही त्यामुळेच पुरंदर वासियांचे भूषण असणारी ही फळे जगभरातील बाजारपेठांमध्ये पोचण्याचे ध्येय आहे.
रोहन उरसळ, संपर्क :- 9881001119 / अध्यक्ष पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक कंपनी
अंजीर ब्रेड स्प्रेड बाजारात दाखल :-
हायलँड शेतकरी उत्पादक कंपनीचा अंजीर ब्रेड स्प्रेड 210 ग्रॅमच्या बॉटलमधून विक्री करण्यात येत असून, यासाठी 225 रुपये किंमत आकारण्यात येत आहे. हे उत्पादन ॲमेझान या ई-कामॅर्ससह पुण्यातील प्रसिद्ध ग्राहक पेठ आणि डागा ब्रदर्स या सुपर स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. सध्या 15 हजार बॉटल्स विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे उरसळ यांनी सांगितले…
शेतकऱ्यांची यशोगाथा :- गणेश वाघमोडे