पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकारने दिवाळीपूर्वी संरक्षण पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. ‘वन रँक, वन पेन्शन’ (OROP) योजनेचा तिसरा हप्ता दिवाळीपूर्वी जारी करण्याचे आदेश संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहेत. तिसर्या हप्त्याची रक्कम लवकरच पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होणार असल्याने त्यांची दिवाळी गोड होणार आहे.
बँका आणि एजन्सींना देण्यात आले निर्देश..
खरंतर, संरक्षण मंत्रालय टच सिस्टीमद्वारे निवृत्तीवेतन प्राप्त करणार्या माजी संरक्षण कर्मचार्यांना वन रँक, वन पेन्शन योजनेंतर्गत पेमेंटचा तिसरा हप्ता जारी करण्याचे निर्देश संरक्षणमंत्र्यांनी दिले आहेत.
याअंतर्गत सर्व माजी सैनिकांना पेन्शनसाठी वन रँक, वन पेन्शनचा हप्ता दिवाळीपूर्वी जारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संरक्षण मंत्री कार्यालयाने सांगितले की, सर्व संरक्षण निवृत्तीवेतनधारकांनी ‘टच’ सिस्टीमद्वारे पेन्शन काढण्यासाठी बँका आणि इतर एजन्सींना सूचना देखील दिल्या आहेत. या निर्णयामुळे 25.13 लाख पेन्शनधारक आणि पेन्शनधारक कुटुंबांना फायदा होईल असा अंदाज आहे. यामध्ये 4.52 लाख नवीन लाभार्थ्यांचाही समावेश होणार आहे.
या पेन्शनधारकांना मिळणार लाभ..
गेल्या डिसेंबरमध्ये केंद्रातील मोदी सरकारने OROP अंतर्गत संरक्षण कर्मचार्यांच्या पेन्शनमध्ये मागील तारखेपासून म्हणजेच 1 जुलै 2019 पासून सुधारणा करण्यास मान्यता दिली होती, ज्या अंतर्गत थकबाकी चार हप्त्यांमध्ये भरायची आहे. हप्ते यापूर्वी जारी करण्यात आले होते.
आता तिसरा हप्ता नोव्हेंबर 2023 मध्ये जारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये 30 जून 2019 पर्यंत सेवानिवृत्त झालेले संरक्षण कर्मचारी सुधारित पेन्शनच्या कक्षेत आहेत, परंतु 1 जुलै 2014 नंतर मुदतीपूर्वी सेवानिवृत्त झालेले संरक्षण कर्मचारी या योजनेत समाविष्ट नाहीत..
2015 मध्ये लागू करण्यात आली योजना..
उल्लेखनीय आहे की, केंद्र सरकारने 2015 मध्ये OROP योजना लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली होती. यामध्ये दर 5 वर्षांनी पेन्शनचा आढावा घेण्याची तरतूद करण्यात आली होती. याअंतर्गत संरक्षण दलातील जवान आणि कौटुंबिक पेन्शनधारकांसाठी वन रँक, वन पेन्शन ( OROP) लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. 1 जुलै 2014 पासून पेन्शनच्या पुनरावृत्तीबाबत एक पॉलिसी पेपर 7 नोव्हेंबर 2015 रोजी जारी करण्यात आला होता, ज्यामध्ये भविष्यात दर 5 वर्षांनी पेन्शन पुन्हा निश्चित केली जाईल असे नमूद केले होते.