दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांना सरसकट 6 हजार रुपयांचा बोनस जाहीर केल्याची माहिती एसटी महामंडळातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. गुरुवार, 9 नोव्हेंबर रोजी मंत्री उदय सामंत आणि एसटी संघटना यांच्यात पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आल्या. यामध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरसकट 6 हजार रुपये बोनस जाहीर झाल्याचे एसटीतील विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील महानिर्मिती, पारेषण वितरण कंपन्यांतील कर्मचारी, अभियंते व अधिकारी यांना 18 हजार 500 तर सहाय्यक कर्मचारी व प्रशिक्षणार्थी अभियंते यांना 12 हजार 500 रुपये बोनस देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीच्या अध्यक्षतेखाली व ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला व तिन्ही वीज कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या वीज कर्मचाऱ्यांना 18,500 रुपये उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय कुमार, डॉ. पी. अनबलगम, तिन्ही कंपन्यांचे मानव संसाधन संचालक, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, कामगार संघटनांचे पदाधिकारी कॉम्रेड मोहन शर्मा, कृष्णा भोयर, आर. टी, देवकात, रवींद्र बारई, केदार रेळेकर, सुहास खुमकर, सय्यद जहरुदिन, भाऊसाहेब भाकरे, दत्तात्रय गुट्टे इत्यादी 27 संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
MMRDA च्या कर्मचाऱ्यांना 42 हजारांचे सानुग्रह अनुदान..
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 42 हजार 350 रूपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सानुग्रह अनुदानात 10 टक्क्यांची वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हे सानुग्रह अनुदान सर्व संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
MMRDA चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी, सानुग्रह अनुदानाचा हा निर्णय म्हणजे एमएमआरडीएच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची खास भेटच ठरेल. कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक आनंदात जाईल, ते प्राधिकरणाच्या कामात आणखी उत्साहाने योगदान देत राहतील, असा विश्वास व्यक्त केला आहे..