शेतीशिवार टीम, 2 जानेवारी 2022 : देशभरात कोरोनाचा कहर वेगाने वाढताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस केसेसमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज संपूर्ण देशात कोरोनाबाधितांची संख्या तब्बल 27 हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासात एकूण 27553 नवे रुग्ण आढळले आहे.
यापूर्वी शनिवारी देशातील मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा धोकादायक वेग दिसून आला होता. यामध्ये मुंबईत 6347, दिल्लीत 2716 आणि कोलकात्यात 2398 रुग्ण आढळले आहेत.
यासोबतच Omicron च्या नव्या व्हेरियंटच्या केसेसनेही वेग पकडायला सुरुवात केली आहे. संपूर्ण देशाबद्दल बोलायचं झालं तर येथील Omicron रुग्णांची संख्या 1525 वर पोहोचली आहे. यामध्येही सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून त्यांची संख्या 460 झाली आहे.
कोरोनाचा वाढत वेग…
रोज कोरोनाचा वाढता वेग पाहता 35 ते 36 वाढत आहे. शनिवारी 24 तासांत देशभरात एकूण 22 हजार 775 नवे कोरोना रुग्ण आढळले. या दिवशी 406 रुग्णांचा मृत्यू झाला असून 8949 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. असाच काहीसा प्रकार राज्यात घडला आहे. येथे शनिवारी कोरोनाचे 6347 रुग्ण आढळले आणि एकाचा मृत्यू झाला.
सध्या मुंबईची स्थिती अशी आहे की, येथे 10 कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. याशिवाय येथील 157 इमारतीही सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत एकूण 22,334 अँक्टिव्ह रुग्ण आहेत.
सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी घालण्यात आली आहे.