शेतीशिवार टीम, 2 जानेवारी 2022 : कॅलेंडर वर्ष 2021 हे स्मॉलकॅप स्टॉकचं होतं, ज्यामध्ये BSE स्मॉलकॅप इंडेक्सने 62% अधिक रिटर्न्स दिले आहे. बर्याच शेयर्सनी चांगली कामगिरी करत गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला आहे.
असाच एक स्मॉलकॅप स्टॉक हा कापड उत्पादक आदिनाथ टेक्सटाइल्सचा (Adinath Textiles) आहे. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 5,000% वाढ झाली आहे.
1 लाखांचे झाले 48 लाख :-
लुधियानात असलेल्या आदिनाथ टेक्सटाइल्सने गेल्या एका वर्षात 4,840% रिटर्न्स दिले आहेत. 31 डिसेंबर 2021 पर्यंत त्याचा स्टॉक रु. 84.50 वर गेला आहे. जो गेल्या वर्षी याच दिवशी 1.7 रुपये होता. त्यामुळे गेल्या वर्षाच्या अखेरीस या आदिनाथ टेक्सटाइल्स मध्ये गुंतवलेले 1 लाख आता सुमारे 48 लाखात बदलले असते.
हा शेयर्समध्येएका वर्षात वर्षात झाली झपाटयाने वाढ…
31 डिसेंबर 2020 च्या 52 आठवड्यांच्या नीचांकी 1.71 पासून, 29 सप्टेंबर 2020 रोजी 101.70 च्या विक्रमी उच्चांकावर पोहचला होता. यावेळी आदिनाथ टेक्सटाइल्सने थक्क करणारा प्रवास केला.
गेल्या सहा तिमाहीत कंपनीने शून्य विक्री नोंदवूनही ही विक्रमी रॅली आहे. कॅलेंडर वर्ष 2021 मध्ये, आदिनाथ टेक्सटाइल्सच्या शेअरच्या किमतीत 4,841% वाढ झाली, जी सहा महिन्यांच्या कालावधीत 1,470% आणि मागील एका महिन्यात 67% होती.