शेतीशिवार टीम, 2 जानेवारी 2022 : चांगल्या शेयर्सची निवड करणं आणि त्या शेयर्सबद्दल काही वर्षांकरता विसरून जाणं हीच तर शेयर मार्केटमध्ये पैसे कमवण्याची खरी गुरुकिल्ली आहे. असाच एक शेयर्स म्हणजे HDFC बँक.
हा बॅकिंग शेयर्स 1 जानेवारी 1999 रोजी NSE वर 5.52 रुपयांवर बंद झाला. परंतु, 31 डिसेंबर 2021 रोजी त्याची बंद किंमत 1481 रुपये होती. या 23 वर्षांच्या कालावधीत या स्टॉकमध्ये 268 पट वाढ झाली आहे.
HDFC बँकेच्या शेअरच्या किमतीचा इतिहास पहिला तर हा बँकिंग शेअरवर गेल्या 6 महिन्यांपासून विक्रीचा दबाव आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये 1.50 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या 1 वर्षात केवळ 4% वाढ दाखवण्यात यश आलं असलं तरी याचा अर्थ असा नाही की, एचडीएफसी बँक (HDFC Bank) हा खराब शेयर्स आहे.
याआधी, जर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) शेअरच्या किमतीचा इतिहास पाहिला, तर हा शेअर गेल्या 5 वर्षांतील मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. गेल्या 5 वर्षात हा स्टॉक 596 रुपयांवरून 1481 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत या समभागात सुमारे 150% वाढ झाली आहे.
तसेच, गेल्या 10 वर्षात एचडीएफसी बँकेचा (HDFC Bank) शेयर्स सुमारे 215 रुपयांवरून 1481 रुपयांपर्यंत वाढला आहे. तर गेल्या 20 वर्षात हा शेअर 22 रुपयांवरून 1481 रुपयांपर्यंत 67 पटीने वाढला आहे.
गेल्या 23 वर्षांबद्दल बोलायचं झालं तर या शेयर्सने मोठा धमकाच केला आहे. या शेअर्सने 5.52 रुपयांवरून 1481 रुपयांपर्यंतचा पल्ला गाठला आहे. या काळात त्याने गुंतवणूकदारांना 26,725% रिटर्न्स दिले आहेत.
जर या शेयर्समध्ये 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते आज 2.5 लाख रुपये झाले असते.
10 वर्षांपूर्वी एखाद्याने या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज 7 लाख रुपये झाले असते.
20 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये जर कोणी 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 67 लाख रुपये मिळाले असते.
जर एखाद्याने 23 वर्षांपूर्वी 5.52 रुपये प्रति शेअर या दराने HDFC Bank मध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि तो आतापर्यंत या शेयर्समधून त्याला आज 2.68 कोटी रुपये मिळाले असते.