शेतीशिवार टीम, 2 जानेवारी 2022 : जगातील लाखो लोक टॉयलेट मधल्या अशा काही सवयींमुळे दरवर्षी प्रोस्टेट कॅन्सरने मरतात. उपचाराच्या दृष्टीने सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या ब्रिटेनमध्ये दरवर्षी प्रोस्टेट कॅन्सरची 50,000 प्रकरणे आढळून येतात. त्यापैकी 12000 लोकांचा या आजाराने मृत्यू होतो. या आजारात अनेक लक्षणे दिसतात.
ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात आणि नंतर तो नंतर धोकादायक असल्याचं सिद्ध होतं. म्हणूनच आजच्या पोस्टमध्ये आपण अशाच काही लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याकडे बहुतेक लोक सामान्य म्हणून दुर्लक्ष करतात, पण नंतर त्यांना कळतं की ते ज्या लक्षणांकडे दुर्लक्ष करत होते ते खरं तर प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे होती. हे कळल्यानंतर त्यांना पश्चाताप करावा लागतो. म्हणूनच पश्चात्ताप करण्यापूर्वी त्याबद्दल जाणून घेणे आणि ही लक्षणे वेळीच ओळखणे चांगले…
चला तर मग जाणून घेऊया सविस्तर :-
हा रोग शेवटच्या स्टेज मध्ये आढळतो :-
एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, ब्रिटेन (यूके) मधील 8 पैकी 1 पुरुषाला प्रोस्टेट कॅन्सर होतोय . जेव्हा त्यांचा कॅन्सर इतरांना संक्रमित होतो तेव्हा हा रोग जीवघेणा ठरतो. त्यानंतर पीडित व्यक्तीला वाचवणे कठीण होतं. प्रोस्टेट कॅन्सर का होतो याचे कारण अद्याप कळलेलं नाही. पण अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे त्याचा धोका वाढतो. उदाहरणार्थ, जर तुमच्या घरात कोणीतरी या आजाराने ग्रस्त असेल तर धोका आणखी वाढतो.
प्रोस्टेट कर्करोगाची मुख्य लक्षणे :-
1. लघवी करण्यासाठी निम्या रात्रीला झोपेतून उठून जाणे.
2. लघवी करताना अचानक प्रेशर, दबाव येणे.
3. लघवी करताना आग होणे ,तसेच त्रास जाणवणे.
4. लघवी करताना न कळत जोर लागणे.
5. तुमची मूत्राशय पूर्णपणे रिकामं झालं नाही असं वाटणं, थेंब थेंब लघवी येणे.
6. तुमच्या मूत्र किंवा विर्या मध्ये रक्त येणं .
40 वर्षांवरील लोकांनी सतर्क राहावं :-
वैद्यकीय तज्ञांचं म्हणणं आहे की, 40 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना याचा धोका जास्त असतो किंवा ज्यांच्या कुटुंबात प्रोस्टेट कॅन्सरचे रुग्ण आहेत, त्यांनी त्यांची बॉडी टेस्ट करून घ्यावी. प्रोस्टेट कॅन्सर का होतो हे कोणालाच माहीत नाही. पण वर नमूद केलेली लक्षणे सांगितली आहेत, ज्या लक्षात घेऊन तुम्ही हा आजार टाळू शकता…
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका :-
या आजाराची सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे जोपर्यंत तो शरीरात पूर्णपणे पसरत नाही तोपर्यंत हा आजार जाणवत नाही. प्रोस्टेट कॅन्सर ची इतरही लक्षणे आहेत. यामध्ये अचानक शरीराचं वजन कमी होणे, हाडे किंवा पाठीत खूप दुखणे,अंडकोषांमध्ये दुखणे यासारख्या समस्यांचा समावेश होतो. ही सर्व लक्षणे प्रोस्टेट कॅन्सर ची आहेत.