कोणतीही शेती करताना लागणारा पैसा हा शेतकऱ्यांसाठी मोठा खर्च असतो. जास्त खर्च होऊन पिकाला योग्य भाव मिळत नाही, तेव्हा त्यांना नफ्याऐवजी तोटाच होतो सध्याच्या कांडा प्रश्नावरून तुम्हाला समजलंच असेल..

शेतकऱ्यांच्या खर्चाचा मोठा भाग ट्रॅक्टरच्या खर्चात जातो. गहू, मोहरी, धान, ऊस, तेलबिया, कडधान्ये असोत किंवा फळे – भाजीपाला असो, त्यात ट्रॅक्टरचे काम हमखास केले जाते आणि शेतकरी त्यात भरपूर पैसा खर्च करतात. मात्र नवीन तंत्रज्ञानामुळे हा खर्च आता कमी होऊ शकतो. खरे तर इलेक्ट्रिक आणि हायब्रीड ट्रॅक्टर बाजारात आले आहेत, ज्याचा वापर करून डिझेलवर खर्च होणारा पैसा वाचू शकता.

हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहेत, तसेच ते पर्यावरणासाठीही चांगले आहेत. इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या वापरामुळे आवाजही कमी होतो आणि पेट्रोल डिझेलसारख्या इंधनावरील अवलंबित्वही कमी होते. जाणून घ्या बाजारात कोणते इलेक्ट्रिक आणि हायब्रीड ट्रॅक्टर उपलब्ध आहेत आणि त्यांची किंमत, फीचर्स काय आहेत ? (EV Tractor)

ऑटोनेक्स्ट ऑटोमेशनचे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर :-

फक्त इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बनवणाऱ्या Autonext Automation कंपनीने अलीकडेच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर X45H2 लाँच केला आहे. या ट्रॅक्टर X45H2 मध्ये 2 चार्जिंग ऑप्शन आहेत ज्यामध्ये हा ट्रॅक्टर सामान्य पद्धतीने 8 तासांमध्ये आणि जलद चार्जिंगद्वारे 2 तासांमध्ये पूर्ण चार्ज होतो. पूर्ण चार्ज केल्यावर, तो सुमारे 8 तास काम करू शकतो किंवा सुमारे 8 एकरापर्यंत जमिनीचे काम पूर्ण करू शकतो. ऑटोनेक्स्ट कंपनीचे इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची अनेक मॉडेल्स मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

खरेदी व अधिक माहितीसाठी करा क्लिक :- Autonxt X45H2

सोनालिका इलेक्ट्रिक ट्रॅक्टर :-

सोनालिका टायगर 11HP इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Sonalika Tiger 11HP) आकाराने अतिशय कॉम्पॅक्ट आहे, ज्यामुळे शेतकरी बागकामाची कामे करू शकतात. यात 25.5KW ची नॅच्युरल कूलिंग बॅटरी आहे. ही बॅटरी 10 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. या ट्रॅक्टरमध्ये फास्ट चार्जिंगचा ऑप्शन देखील आहे ज्यामुळे तो 4 तासात चार्ज होऊ शकतो. पूर्ण चार्ज केल्यावर ट्रॅक्टर 8 तास काम करू शकतो. या ट्रॅक्टरचा वापर करून शेतकरी 75% पर्यंत खर्च कमी करू शकतात. ट्रॅक्टरची किंमत 6.40 ते 6.72 लाखांपर्यंत आहे..

खरेदी व अधिक माहितीसाठी करा क्लिक :- Sonalika Tiger 11HP

HAV हायब्रीड ट्रॅक्टर :-

HAV ट्रॅक्टर हे देशातील पहिला हायब्रीड ट्रॅक्टर आहेत जो इलेक्ट्रिक व्यतिरिक्त डिझेल किंवा CNG सारख्या इतर इंधनांवर चालवू शकतात. HAV ट्रॅक्टर सीरीजमध्ये दोन प्रकारचे मॉडेल आहेत, ज्यामध्ये 50 S1 मॉडेल डिझेल हायब्रीड आहे, म्हणजेच ते डिझेल आणि विजेवर चालेल..

50 S2 हा CNG हायब्रीड आहे, त्यामुळे तो डिझेल तसेच CNG वरही चालू शकतो. या ट्रॅक्टरचा वापर करून तुम्ही इतर ट्रॅक्टरच्या तुलनेत 50% पर्यंत इंधन वाचवू शकता. त्यांची किंमत 8.50 लाख रुपयांपासून सुरू होते..

खरेदी व अधिक माहितीसाठी करा क्लिक :- HAV 50 S2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *