आता प्रत्येक शेतकऱ्याचं ट्रॅक्टर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण! 15 लाखांच्या कर्जाच्या व्याजावर मिळतंय 70 ते 80% पर्यंत व्याज परतावा..
राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, आता सर्व शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे, कारण यावेळी शासनाने सर्व शेतकऱ्यांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारी ट्रॅक्टर योजना पुन्हा सुरू केली आहे.
शेतीची मशागत करण्याकरता प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःचा ट्रॅक्टर घेण्याची इच्छा असते. यासाठी शासनामार्फत ट्रॅक्टर अनुदान योजना राबविण्यात येत आहे. अण्णासाहेब पाटील मंडळातर्फे राबवण्यात येणाऱ्या या योजनेमध्ये कर्ज घेणाऱ्या ग्राहकाला कर्जाच्या व्याजावर 70% ते 80 % पर्यंत व्याज परतावा मिळणार असल्याने योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्पभूधारक मराठा शेतकर्यांना फायदा होणार आहे.
मराठा बांधवांसाठी आत्तापर्यंत 5 हजार 140 कोटींचे कर्ज वाटप. .
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून आत्तापर्यंत 70 हजार व्यावसायिकांनी कर्ज मुळवून आपली प्रगती साधली आहे. यापैकी 58 हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना महामंडळाने 567 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा व्याज परतावा केला आहे.
मराठा बांधवांनो 15 लाखांचं अर्थसहाय्य मिळणार –
आता या योजनेअंतर्गत शेती पूरक व्यवसायाला अधिक प्राधान्य देण्यात आले असून ट्रॅक्टर खरेदी योजना पुन्हा सुरु करण्यात आली असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.
महामंडळाच्या योजनांची जनजागृती राज्यामध्ये गावपातळीपर्यंत करण्याच्या उद्देशाने जिल्हानिहाय दौरे, मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये या माध्यमातून महामंडळाच्या योजनांची प्रचार – प्रसिध्दी करण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचं लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
या योजनेमध्ये कर्ज घेणाऱ्या ग्राहकाला मिळणार कर्जाच्या व्याजावर ७० % ते ८० % पर्यंत व्याज परतावा..
ट्रॅक्टर खरेदी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे..
1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) रेशन कार्ड
4) शाळा सोडल्याचा दाखला / जातीचे प्रमाण पत्र
5) ३ वर्षे उत्पनाचा तहसीलचा दाखला
6) आधारला लिंक असलेले मोबाइल नंबर
7) कॅन्सल चेक