शेतीशिवार टीम, 20 फेब्रुवारी 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.
खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.
प्रश्न : मिस वर्ल्डचा किताब जिंकणाऱ्या भारतातील पहिल्या महिलेचे नाव?
उत्तर : रीता फारिया
प्रश्न : माउंट एव्हरेस्ट चढणाऱ्या भारतातील पहिल्या महिलेचे नाव?
उत्तर : बचेंद्री पाल
प्रश्न : मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणाऱ्या भारतातील पहिल्या महिलेचे नाव?
उत्तर : सुष्मिता सेन
प्रश्न : भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण होती ?
उत्तर : किरण बेदी
प्रश्न : ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणाऱ्या भारतातील पहिल्या महिलेचे नाव काय?
उत्तर : आशापूर्णा देवी
प्रश्न : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती ?
उत्तर : कमलजीत संधू
प्रश्न : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पहिल्या गव्हर्नरपदी कोणाची निवड झाली ?
उत्तर : सी. डी. देशमुख
प्रश्न : एव्हरेस्टवर चढाई करणारी पहिली व्यक्ती कोण होती ?
उत्तर : शेर्पा तेनझिंग नोर्गे आणि सर एडमंड हिलरी यांनी 29 मे 1953 रोजी एव्हरेस्टची चढाई केली.
प्रश्न : भारतीय राज्यघटनेत आता किती कलमे आहेत?
उत्तर : 448
प्रश्न : संत तुकाराम महाराज्यांचे शिष्य कोण – कोण होते ?
उत्तर : संत बहिणाबाई संत निळोबा, भगवानबाबा
प्रश्न : संत तुकाराम महाराजांचे मूळ नाव काय होते?
उत्तर : तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)
प्रश्न : असा कोणता प्राणी आहे, ज्याचा हात लागताच मृत्यू होतो ?
उत्तर : टिटोनी पक्षी
प्रश्न : फक्त 27 चं लोकं राहणाऱ्या देशाचं नाव सांगा ?
उत्तर : या देशाचे नाव सीलँड आहे, जो इंग्लंडच्या सॅफोल बीचपासून सुमारे 10-12 किलोमीटर अंतरावर आहे. इथला संपूर्ण परिसर फक्त टेनिस कोर्टएवढा आहे. तर या देशाची एकूण लोकसंख्या 27 इतकी आहे.
प्रश्न : भारताच्या पहिल्या महिला IAS कोण होत्या ?
उत्तर : अण्णा राजम मल्होत्रा
प्रश्न : भारताचं पाहिलं चांद्रयान केव्हा प्रक्षेपित करण्यात आलं होतं ?
उत्तर : भारताने 22 ऑक्टोबर 2008 रोजी चंद्रावर जाणारे पहिले अंतराळयान चांद्रयान प्रक्षेपित केले. परंतु 312 दिवसांनी अंतराळयानचं कनेक्शन तुटलं होतं.
प्रश्न : कोणत्या ग्रहावर सर्वात जात चंद्र आहेत ?
उत्तर : सूर्यमालेतील सर्वात जास्त चंद्र असलेला ग्रह म्हणजे गुरू (जुपिटर) . 2009 मध्ये या ग्रहावर एकूण 63 चंद्र सापडले होते.
प्रश्न : मानवी ह्दय दर मिनिटाला किती वेळा धडकतं ?
उत्तर : 72
प्रश्न : भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात ?
उत्तर : 17
प्रश्न : चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता ?
उत्तर : चीन
प्रश्न : असा कोणता प्राणी आहे त्याचं रक्त हिरवं असतं ?
उत्तर : न्यू गिनी नावाच्या गिरगिटाला हिरवे रक्त असते. हिरव्या रक्तामुळे त्याचे स्नायू आणि जीभही हिरवी असते.
प्रश्न : अंड्याचे रासायनिक सूत्र काय आहे ?
उत्तर : अंड्याचे बाह्य कवच कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेलं असतं, त्याचे रासायनिक सूत्र CaCO3 आहे.
प्रश्न : टॉम आणि जेरी कार्टून कोणी तयार केलं ?
उत्तर : टॉम अँड जेरी (Tom and Jerry) ही विल्यम हॅना (William Hanna) आणि जोसेफ बारबेरा (Joseph Barbera) यांनी तयार केलेली 1940 च्या कॉमेडी चित्रपटांची अमेरिकन अँनिमेटेड सिरीज आहे.
प्रश्न : बॉलीवूड इंडस्ट्रीची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर : 1930 मध्ये बॉलीवूडची स्थापना झाली, 1934 मध्ये हिमांशू राय यांनी सुरू केलेल्या बॉम्बे टॉकीजमध्ये (Bombay Talkies) भारतीय सिनेमाच्या विकासाला वेग आला.
प्रश्न : सूर्य सर्वात आधी कुठे उगवतो अन् कुठे मावळतो ?
उत्तर : नॉर्वेला (Norway) मावळत्या सूर्याचा देश म्हणतात कारण, तिथे सूर्य सर्वात आधी नॉर्वेत मावळतो. तर सर्वात आधी सूर्य उगवतो तो देश म्हणजे जपान होय. ..
प्रश्न : IQ चा फुल फॉर्म आणि त्याचा अर्थ काय आहे ?
उत्तर : IQ चे फुल फॉर्म म्हणजे Intelligence Quotient.(IQ) ही बुद्धिमत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी वापरल्या जाणार्या विविध प्रमाणित टेस्टिंगमधून काढलेली गणना आहे. ‘IQ’ हा शब्द जर्मन शब्द Intelligenz-Quotient पासून आला आहे, 1912 मध्ये जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी 20 व्या शतकाच्या सुरूवातीस आधुनिक मुलांच्या बुद्धिमत्तेची चाचणी घेण्यासाठी प्रस्तावित केलेल्या पद्धतींसाठी प्रथम वापरला. परंतु आजही “IQ” हा शब्द अजूनही जगभरात सगळीकडे वापरला जातो.
प्रश्न : एक लीटरमध्ये हेलिकॉप्टर नेमकं किती मायलेज देतं ?
उत्तर : हेलिकॉप्टर एका तासात 50 लिटर ते 60 लिटर इंधन वापरते. आणि एक मैल उडण्यासाठी 1 गॅलन इंधन लागतं. त्याची सरासरी काढण्यासाठी या हेलिकॉप्टरचा वेग ताशी 180 किलोमीटर मानला, तर हेलिकॉप्टर 1 लिटर इंधनात 3 ते ४ किलोमीटर उडू शकतं.
प्रश्न : भारतात पहिला कोरोना रुग्ण कधी आढळला ?
उत्तर : 30 जानेवारी 2020
प्रश्न : जगातील सर्वात पहिली सेल्फी कोणी घेतली होती ?
उत्तर : जगातील सर्वात पहिली सेल्फी 1839 मध्ये रॉबर्ट कार्नेलियस या व्यक्तीने घेतली होती.
प्रश्न : आपली नखे कशापासून बनलेली असतात ?
उत्तर : नखे केराटिन (Keratin) नावाच्या पदार्थाने बनलेले असतात, जो कठोर आणि मृत प्रोटिन्सने बनलेला सिंग सारखा पदार्थ असतो.
प्रश्न : भारतीय नोटेवर गांधीजींचे फोटो कधी छापण्यात आला ?
उत्तर : 1969 मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकेने महात्मा गांधींचा फोटो असलेली 100 रुपयांची पहिली नोट जारी केली. यामध्ये गांधीजींना सेवाग्राम आश्रमासमोर बसलेले दाखवण्यात आले आहे.
… तर ऑक्टोबर 1987 मध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 500 रुपयांची नोट जारी केली ज्यामध्ये महात्मा गांधींचे हसरे चित्र होते. त्यावर सिंहाची राजधानी आणि अशोक स्तंभावर वॉटर मार्क होते.
प्रश्न : क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिला षटकार कोणी मारला होता ?
उत्तर : क्रिकेटमधील पहिला षटकार ऑस्ट्रेलियन खेळाडू चार्ल्स बॅनरमन (Charles Bannerman) याने 3 जून 1877 रोजी मारला होता.
प्रश्न : ताजमहाल मुमताजच्या मृत्यूपूर्वी बांधला गेला की नंतर?
उत्तर : मुमताज महल यांचा मृत्यू 17 जून 1631 रोजी बुरहानपूर येथे मुलगी गौरा बेगमला जन्म देताना झाला. त्यानंतर मुमताज महलच्या स्मरणार्थ शाहजहानने ताजमहाल बांधला जो 1634 मध्ये पूर्ण झाला.
प्रश्न : असं कोणतं रेल्वे स्टेशन आहे जे अर्ध महाराष्ट्रात आहे अन् अर्ध गुजरातमध्ये आहे ?
उत्तर : नवापूर हे सुरत-भुसावळ मार्गावरील असे एक स्थानक आहे, जेथे स्थानकाच्या मध्यभागी दोन राज्यांच्या सीमा मिळतात. त्यामुळे या स्थानकाचा अर्धा भाग गुजरातमध्ये आहे, तर उर्वरित अर्धा भाग महाराष्ट्रात आहे.
प्रश्न : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्रजांच्या काळात कोणतं मंत्रिपद देण्यात आलं ?
उत्तर : कामगार मंत्री
प्रश्न : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे स्वतंत्र भारतात कोणतं मंत्रिपद देण्यात आलं ?
उत्तर : कायदा आणि न्याय मंत्री (15 ऑगस्ट 1947 – 6 ऑक्टोबर 1951)