केंद्र सरकार EPFO नंतर आता पुन्हा देणार ‘हा’ मोठा धक्का | PPF / SSY / RD योजनांच्या व्याजदरात होणार कपात !
शेतीशिवार टीम : 23 मार्च 2022 :- काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ईपीएफवरील व्याजदरात मोठी कपात केली होती. ईपीएफनंतर (EPFO) आता छोट्या बचत योजनांच्या व्याजदरावर कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अल्पबचतींच्या कक्षेत येणाऱ्या सुकन्या समृद्धी योजना(SSY) , सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ (PPF) आणि किसान विकास पत्र (KVP) यासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
भीती का व्यक्त होतेय…
RBI ने आपल्या State of the economy रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, छोट्या बचत योजनांचे सध्याचे व्याजदर तुलनात्मक आधारावर 42-168 BPS जास्त आहेत. तुम्हाला माहिती नसलं तर जाणून घ्या, केंद्र सरकारने 31 डिसेंबर 2021 रोजी स्मॉल सेविंग योजनांवरील व्याजदरांचे पुनरावलोकन केले होते आणि सलग सातव्या तिमाहीत ते अपरिवर्तित ठेवलं होतं.
सरकार 31 मार्च रोजी 2022-23 च्या पहिल्या तिमाहीसाठी स्मॉल सेविंग योजनांवरील व्याजदरांचे पुनरावलोकन करून व्याजदरात घट करू शकते.
स्मॉल सेविंग योजनांवर व्याजदर किती आहेत ते पहा !
भविष्य निर्वाह निधी (PPF) वर 7.1% व्याज दर आहे तर सुकन्या समृद्धी खात्यावरील व्याज दर 7.6% आहे. याशिवाय, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा (SCSS) व्याज दर वार्षिक 7.4% आहे. इतर स्मॉल सेविंग योजनांमध्ये, पोस्ट ऑफिस बचत खात्यावर वार्षिक 4% व्याज दर मिळतो.
याशिवाय, 5-वर्षीय पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट अकाउंट (RD) वर वार्षिक 5.8% व्याजदर आहे. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते (MIS) वर 6.6% वार्षिक व्याजदरासह, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) 6.8% व्याजदरासह आणि किसान विकास पत्र (KVP) 6.9 टक्के व्याजदर आहे. यामुळे या योजना सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय बनल्या आहेत.
EPF व्याजदरात 40 वर्षांतून दिला मोठा धक्का !
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने अलीकडे EPF वरील व्याज 8.5 % वरून 8.1% केला आहे, जो गेल्या जवळपास चार दशकांतील सर्वात कमी आहे.
आता आपण जणूं घेऊयात की, सध्यस्थितीत कोणती योजना आहे बेस्ट : सुकन्या समृद्धी योजना (SSY) की भविष्य निर्वाह निधी (PPF) तसेच व्याजदर / कागदपत्रे / अकाउंट खोलण्याबाबत / त्यामुळे खालील लेख नक्की वाचा…
सुकन्या समृद्धी योजना की भविष्य निर्वाह निधी !
तज्ञांचं असं मत आहे की, आपण आपले सर्व पैसे सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवू नये. काही पैसे पब्लिक प्रॉव्हिडंट फंडातही (PPF) गुंतवले पाहिजेत. सुकन्या समृद्धी योजनेवर तुम्हाला 7.6% व्याज मिळतं. तर, PPF वर व्याज दर 7.1% आहे. व्याजदर दर चार महिन्यांनी सुधारित केला जातो. जेव्हा एखाद्याला PPF आणि सुकन्या समृद्धी योजना यापैकी एक निवडायची असते, तेव्हा गुंतवणूकदाराने सुकन्या समृद्धी योजना निवडावी, कारण ती PF पेक्षा जास्त रिटर्न्स देते. जर तुम्ही PPF मध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तो तुम्हाला एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. म्हणून तुमच्या कमाईचा काही भाग PPF मध्ये देखील गुंतवला पाहिजे.
PPF मध्ये गुंतवणूक…
पीपीएफमध्ये (PPF) गुंतवणूक केल्यास तुम्हाला सरकारी हमी मिळते. यामध्ये तुम्हाला कर सवलतीचा लाभही मिळतो. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर (Tax) सवलतीचा दावा करू शकता. पीपीएफ खात्याची मॅच्युरिटी 15 वर्षे आहे, परंतु ती आणखी 5 वर्षांसाठी वाढवता येऊ शकते.
या खात्यात किमान आणि कमाल ठेव मर्यादा 500 आणि 1.50 लाख रुपये आहे, परंतु हे लक्षात ठेवा की, जर PPF खाते मोठ्या व्यक्तीच्या नावाने उघडलं असेल तर दोन्ही खाती एकत्रितपणे कमाल रकमेची मर्यादा मानली जातील. दोन्ही खात्यांमध्ये वर्षाला दीड लाख जमा होऊ शकतात.
सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) गुंतवणूक…
यामध्ये वर्षाला किमान 250 रुपये जमा करता येतात. योजनेंतर्गत, किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये वार्षिक जमा करता येतात. सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) व्याजाचा दर अनेकदा जास्त असतो. याचे कारण म्हणजे आपल्या पालकांना आपल्या मुलीच्या भविष्यासाठी पैसे उभे करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना आहे.
परंतु, मुलगी 15 वर्षांची होईपर्यंत ठेवी ठेवल्या जाऊ शकतात. तर 16 व्या वर्ष ते 21 व्या वर्षाच्या दरम्यान कोणतीही डिपॉजिट ठेवण्याची परवानगी नाही.तर खात्यावरील व्याज 21 वर्षे जमा होत राहते. त्यामुळे पैसे लॉक केलेले असले तरीही 15 वर्षांपेक्षा जास्त गुंतवणुकीवर निर्बंध आहे…
सुकन्या समृद्धी योजना (SSY) चे 14 अन् 21 वर्षाचे कॅल्क्युलेशन पहा….
राशि (वार्षिक) (₹ में) |
राशि(14 वर्ष) (₹ में) |
मेच्योरिटी राशि (21 वर्ष) (₹ में) |
1000 | 14000 | 46,821 |
2000 | 28000 | 93,643 |
5000 | 70000 | 2,34,107 |
10000 | 140000 | 4,68,215 |
20000 | 280000 | 9,36,429 |
50000 | 700000 | 23,41,073 |
100000 | 1400000 | 46,82,146 |
125000 | 1750000 | 58,52,683 |
150000 | 2100000 | 70,23,219 |
तुम्ही खाते कुठे उघडू शकता…
फॉर्म डाउनलोड : इथे करा क्लिक
तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळवायचा असेल, तर तुम्ही प्रथम अधिकृत वेबसाइट वरून सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्याचा फॉर्म डाउनलोड करणे आवश्यक आहे.
फॉर्म डाउनलोड केल्यानंतर त्यात विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरा.
त्यानंतर तुम्ही आवश्यक कागदपत्रांची फोटो कॉपी सोबत जोडा.
आता ते बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करा, त्यानंतर तुमचे बचत खाते उघडले जाईल.
या दोन्ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जात आहेत. याशिवाय ज्या बँकांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे, त्या बँकांमध्ये सुकन्या समृद्धी योजना (SSY) खाते उघडण्याचीही सुविधा आहे.
आता बॅंकेत जायचीही गरज नाही, ऑनलाईन मोबाईलवर करा पैसे ट्रान्सफर…
पोस्ट ऑफिस 9 प्रकारच्या बचत योजना ऑफर (Small savings plans) करते. RD, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी खाते (SSY) यासह अनेक पोस्ट ऑफिस बचत ठेव योजना आहेत, यापैकी बहुतेक योजना आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर (Tax) लाभ देतात. सुरक्षित गुंतवणुकीसाठी सरकारने या अल्पबचत योजना लोकांना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत.
कसे कराल पैसे ऑनलाईन, ट्रान्सफर घ्या जाणून…
तुम्ही आयपीपीबीद्वारे (IPPB) पोस्ट ऑफिस आरडी, पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी खात्यांमध्ये पैसे कसे हस्तांतरित करू शकता, प्रोसेस पहा –
>> सर्वप्रथम तुमच्या बँक अकाउंट्स मधून IPPB खात्यात पैसे टाका.
>> नंतर DOP Products वर जा.
>> येथे तुम्ही पीपीएफ (PPF) किंवा सुकन्या समृद्धी (SSY) अकाउंटचा ऑप्शन निवडा.
>> तुम्हाला तुमच्या PPF खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर PPF निवडा.
>> तुमचा पीपीएफ खाते क्रमांक (PPF account number) आणि नंतर डीओपी ग्राहक आयडी प्रविष्ट (DOP Customer ID) करा.
>> सुकन्या समृद्धी खात्यातही योगदान या अँप्सद्वारे पैसे ट्रान्सफर करता येईल.
>> तुमचा SSA खाते क्रमांक आणि नंतर DOP ग्राहक आयडी प्रविष्ट करा.
>> आता येथे तुम्ही तुमची इंस्टॉलेशन रक्कम निवडा.
>> त्यानंतर IPPB तुम्हाला मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे यशस्वी पेमेंट ट्रान्सफरसाठी सूचित करेल.