शेतीशिवार टीम, 21 फेब्रुवारी 2022 : Hyundai India is offering discount on i20, Grand i10 Nios, Aura, Santro : भारतातील ‘Hyundai India’ मोटर्सने त्यांच्या काही कारच्या मॉडेल्सवर मोठी सूट दिली आहे. कंपनीने फेब्रुवारी महिन्यासाठी एक उत्तम ऑफर दिली आहे. या सूटअंतर्गत, तुम्हाला Hyundai कारच्या निवडक मॉडेल्सवर ₹50,000 पर्यंत सूट दिली जात आहे.
Hyundai ने गेल्या महिन्यात वर्षाच्या सुरुवातीला आपल्या काही कार मॉडेल्सच्या किमतीत मोठी वाढ केली होती. त्याचबरोबर कंपनीने पुन्हा एकदा डिस्काउंट ऑफर देत ग्राहकांना दिलासा दिला आहे. आता बघा कोणत्या गाडीवर किती डिस्काउंट दिलाय तो…
Hyundai i20, Grand i10 Nios, Aura आणि Santro सारख्या कार सूट आणि अनेक ऑफर्स अंतर्गत उपलब्ध आहेत. ऑफर रोख सवलत, कॉर्पोरेट लाभ व एक्सचेंज बोनस अंतर्गत दिली जाणार आहे.
कंपनीने ही ऑफर तिच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV Creta आणि Alcazar, Venue, Tucson, Elantra आणि Hyundai Verna (Creta, Alcazar, Venue, Tucson, Elantra आणि Hyundai Verna) सारख्या कारवर दिलेली नाही…
Hyundai Grand i10 NIOS :-
तुम्हाला Hyundai Grand i10 Nios वर कमाल ₹ 48,000 ची सूट दिली जात आहे. Grand i10 Nios पेट्रोल, डिझेल व्हेरियंट आणि CNG ट्रिममध्ये उपलब्ध आहे. 5-सीटर कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये येत आहे. Grand i10 Nios ची Ex-showroom किंमत ₹5.29 लाख ते ₹8.51 पर्यंत आहे.
Hyundai Santro :-
त्याचप्रमाणे Hyundai Santro वर देखील सूट दिली जात आहे. Hyundai Santro च्या पेट्रोल व्हेरियंटवर ₹ 40,000 पर्यंत सूट देण्यात आली आहे. ही सूट सीएनजी मॉडेल्सवर मिळणार नाही. Hyundai Santro ही 5-सीटर कार आहे जी 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. Hyundai Santro ची किंमत ₹4.86 लाख ते ₹6.44 लाख (Ex-showroom) दरम्यान आहे.
Hyundai i20 :-
अशाच प्रकारची सूट ही हॅचबॅक, Hyundai i20 वर देण्यात आली आहे. ही ऑफर 28 फेब्रुवारीपर्यंत वैध आहे. ही सूट डिझेल व्हेरियंटवर लागू आहे आणि पेट्रोल मॉडेल या ऑफरमधून वगळण्यात आलं आहे. Hyundai i20 ची विक्री ₹6.98 लाख ते ₹11.47 लाख (एक्स-शोरूम) मध्ये होते.