Varas Nond: आता तलाठ्याविना वारसनोंदीसह ही 8 कामे घरबसल्या करता येणार ! राज्यभर सुविधा सुरु, पहा ऑनलाईन अर्ज प्रोसेस..

0

वडिलोपार्जित घर, जमिनीवरील वारसनोंद दुरुस्ती, फेरफार असल्यास आता नागरिकांना तलाठी कायालयात जाण्याची गरज नाही. नागरिकांना घरबसल्या या नोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा भूमी अभिलेख विभागाने उपलब्ध करून दिली आहे. महसूल सप्ताहाचे औचित्य भूमी अभिलेख विभागाने राज्यभर ही सुविधा सुरू केली आहे. (Varas Nond Online)

मयत व्यक्तीनंतर त्यांच्या वारसांची नोंद घेण्यासाठी नागरिकांना महाभूमि या संकेतस्थळावर अथवा भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन लॉगिंग करून ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.

हा ऑनलाइन अर्ज संबंधित गावच्या तलाठी यांच्याकडे जाईल. तलाठी या अर्जांची ऑनलाइन पडताळणी करतील. कागदपत्रे अपूर्ण असेल तर त्याची माहिती अर्जदाराला मेलद्वारे कळविण्यात येईल.

सध्या पहिल्या टप्प्यात पुढील आठ प्रकारचे फेरफार घेण्यासाठीचे फेरफार प्रकार उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

1. वारस नोंद.
2. बोजा दाखल करणे.
3. बोजा कमी करणे.
4. ई करार नोंदी.
5. मयताचे नाव कमी करणे.
6. अज्ञानपालनकर्ता चे नाव ( अपाक ) कमी करणे.
7. एकत्र कुटुंब पुढारी / म्यानेजर ( एकुम्या ) कमी करणे.
8. विश्वास्थांचे नाव कमी करणे.
9) 7/12 उताऱ्यावरील चुका दुरुस्त करणे.

वारसनोंदीसाठी कागदपत्रे – स्टेप बाय स्टेप ऑनलाइन अर्ज प्रोसेस पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

वारसनोंदीसाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल ? 

सर्वप्रथम https://pdeigr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर लॉगिन करा..

– या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

– अर्ज संबंधित गावच्या तलाठ्याकडे जाईल.

– तलाठी अर्जाची ऑनलाइन पडताळणी करतील.

– कागदपत्रे अपूर्ण असतील तर त्याची माहिती अर्जदाराला मेलद्वारे मिळणार.

– कागदपत्रे पूर्ण असल्यास त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यात येणार.

एक ऑगस्टपासून राज्यात वारसनोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे . पुढील टप्प्यात कर्जाचा बोजा दाखल करणे, अथवा कमी करणे, एकत्र कुटुंब मॅनेजर नोंद कमी करणे आदी सुविधांसाठी ई – हक्क प्रणाली तून सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. अशी माहिती जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांश यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.