Gold Price Today: सोनं 56 हजारांपार, आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले ; पहा सोनं – चांदीचे आजचे नवे दर..
सोन्याने आज 13 जानेवारी 2023 रोजी आपल्या सार्वकालिक उच्चांकी किंमतीला स्पर्श केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मौल्यवान धातूंची बाजारभाव पाहता, भारतीय फ्युचर्स मार्केटमधील सोन्याच्या किमतींनी ऑगस्ट 2020 फ्युचर्स मार्केटमधील किंमतीला देखील मागे टाकले आहे. MCX वर सोन्याचे फ्युचर दुपारी 02:20 च्या सुमारास 56,245 वर पोहोचले. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,191 च्या ऐतिहासिक पातळीला स्पर्श केला होता. मात्र, सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सराफा बाजारात सोन्याचा भाव खाली घसरला. तथापि, फ्युचर्स मार्केटमधील किमती विक्रमी वाढीसह नोंदवल्या गेल्या आहेत.
देशाच्या राजधानीतील सराफा बाजारातील दरांवर नजर टाकली तर, गुरुवारी सोन्याचा भाव 105 रुपयांनी घसरून 56,082 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. त्याच वेळी, गेल्या व्यापार सत्रात सोने 56,187 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. चांदीचा भावही 572 रुपयांनी घसरून 68,754 रुपये प्रति किलोवर बंद झाला आहे.
फ्युचर्स मार्केटमध्ये आज, शुक्रवार, 13 जानेवारी, 2023 रोजी, सकाळच्या वेळी धातूंचे मूल्य हिरव्या चिन्हामध्ये दर्शवले जात होते. एमसीएक्स (गोल्ड फ्यूचर रेट) वर सोन्याचे फ्युचर्स रु. 93 किंवा 0.17% च्या वाढीसह रु. 55,968 वर व्यवहार करत होते. त्याची सरासरी किंमत 55,963 रुपये होती. मागील सत्रात ते 55,875 वर बंद झाले होते.
या काळात चांदीचा भाव 37 रुपयांनी म्हणजेच 0.05 टक्क्यांनी वाढून 68,680 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला होता. त्याची सरासरी किंमत 68,728 रुपये प्रतिकिलो नोंदवली गेली आहे. कालच्या सत्रात चांदी 68,643 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली होती.
आता IBJA (India Bullion And Jewellers Associaton Ltd.) वर सोन्या-चांदीच्या वेगवेगळ्या कॅरेटच्या दरांमध्ये काय फरक आहे ते पाहू..
काय आहे सोन्याच्या दागिन्यांचे रेट
– Fine Gold (999)- 5,625 प्रति/ग्रॅम
– 22 KT- 5,490 प्रति / ग्रॅम
– 20 KT- 5,007 प्रति / ग्रॅम
– 18 KT- 4,557 प्रति / ग्रॅम
– 14 KT- 3,628 प्रति / ग्रॅम
– Silver (999)- 67,848 प्रति / किलो
सोन्याचे हे दर प्रति ग्रॅम आहेत आणि त्यात GST आणि मेकिंग चार्जेस जोडलेले नाहीत.
IBJAचे कालचे दर..
– 999- 56,254 रुपये प्रति 10 ग्रॅम
– 995- 56,029 रुपये प्रति 10 ग्रॅम
– 916- 51,529 रुपये प्रति 10 ग्रॅम
– 750- 42,191 रुपये प्रति 10 ग्रॅम
– 585- 32,909 रुपये प्रति 10 ग्रॅम
– Silver- 67,848 रुपये प्रति 1 किलो
सोन्याचे हे दर प्रति 10 ग्रॅम आहेत आणि त्यात GST आणि मेकिंग चार्जेस जोडलेले नाहीत.
सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमती :
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. Comex वर, US मधील सोने $19.90 म्हणजेच 1.06% ने वाढून 1,898.80 वर पोहोचले होते.