Take a fresh look at your lifestyle.

Mumbai Metro : मेट्रो 2A व मेट्रो-7 च्या टप्प्याचे मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण, अंधेरी – दहिसर ते D.N. नगर ‘हे’ आहेत 32 स्टेशन्स पहा Route Map..

0

मुंबई मेट्रो मार्ग ‘7’ आणि मेट्रो मार्ग ‘2 अ’ ची सेवा मुंबईकरांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबई मेट्रो मार्ग 7 (टप्पा – 2 ) आणि मार्ग 2 अ (टप्पा -2) चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारी रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंधेरी परिसरातील गुंदवली स्थानकाला भेट देऊन लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीची तसेच तेथील सुविधांची पाहणी केली.

यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही. आर. श्रीनिवास, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आदी उपस्थित होते.

प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मेट्रो मार्ग 7 आणि मेट्रो मार्ग 2 अ’ चा 35 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. यामध्ये एकूण 33 स्थानके आहेत. हा टप्पा सुरू झाल्यावर अंधेरी, दहिसर, वर्सोवा या परिसरातील मुंबईकरांसाठी ही मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन मा. पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते झाले होते. आता याचा लोकार्पण सोहळा देखील त्यांच्याच हस्ते होईल, हा मोठा योगायोग आहे. हा प्रकल्प मुंबईतील लाखो लोकांना दिलासा देणारा ठरणार आहे. यामुळे मुंबईतील लोकांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. मुंबईमध्ये आम्ही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

त्यात काँक्रीटचे रस्ते, एसटीपी प्लांट, आरोग्याविषयक व सुशोभिकरणाच्या काही प्रकल्पांचेही पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. ही मुंबईकर नागरिकांसाठी एक मोठी भेट ठरणार आहे. असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुंबई मेट्रो कॉरिडॉरमध्ये एकूण 337.1 किमी लांबीचे मार्ग बांधण्याचे उद्दिष्ट आहे. हे सर्व मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यानांतर मेट्रो प्रणालीमध्ये दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रणालीच्या 1.3 पट प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता असणार आहे.

काय आहेत मुंबई मेट्रो मार्ग 7 ची वैशिष्ट्ये..

मुंबई मेट्रो मार्ग 7 गुंदवली (अंधेरीपूर्व) ते दहिसर पूर्व कॉरिडॉर हे पश्चिम द्रुतगती मार्गालगत असून मुंबई मेट्रो मार्ग 7 मुळे मुंबईच्या पश्चिमेकडील भागांना पूर्वेकडील भागाशी जोडून सेवा देता येणार आहे.

मार्ग 7 मुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील भार कमी होण्यास मदत होणार आहे.

मुंबई मेट्रो मार्ग -7, टप्पा -1 आणि टप्पा 2 असा दोन टप्यात पूर्ण केला आहे.

मुंबई मेट्रो मार्ग 7 (टप्पा -1) हा 10.902 किमी लांबीचा विकसित कॉरिडॉर आहे. ज्यामध्ये एकूण 9 स्थानके आहेत. ज्यामध्ये (1) ओवरीपाडा (2) राष्ट्रीय उद्यान (3) देवीपाडा (4) मागाठाणे (5) पोईसर (6) आकुर्ली (7) कुरार (8) दिंडोशी (9) आरे या मेट्रो स्थानकाचा समावेश आहे.

मुंबई मेट्रो मार्ग 7 टप्पा – (2) . 5.5 किमी लांबीचा एलिव्हेटेड कोरिडॉर आहे. ज्यामध्ये एकूण 4 स्थानके आहेत. ज्यामध्ये (1) गोरेगाव पूर्व (2) जोगेश्वरी पूर्व (3) मोगरा (4) गुदवली या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.

Mumbai Metro : Route Map पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

मेट्रो मार्ग ‘2 अ’ ची वैशिष्ट्ये

मेट्रो मार्ग ‘2 अ’ अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व असा आहे. दहिसर पूर्व, आनंद नगर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली पश्चिम, पहाडी एकसर, कांदिवली पश्चिम, डहाणूकरवाडी ही स्थानके या मार्गावर असणार आहेत.

मेट्रो मार्ग 2 अ ( टप्पा -2 ) हा 8.768 किमी लांबीचा एलिव्हेटेड मार्ग आहे. वळनई, मालाड पश्चिम, लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव पश्चिम, ओशिवरा, लोअर ओशिवरा, अंवेरी पश्चिम ही स्थानके या मार्गावर असणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.