गावोगावच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी पतसंस्था म्हणजेच विकास सोसायट्या आता अजुनच बळकट होणार आहेत. केंद्र शासनाने विकास सेवा सोसायट्यांना सक्षम बनावण्यासाठी संगणकीकरणासाबतच त्यांना १५० विविध व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे. 

यामध्ये कृषीशी संबंधित व्यवसाय, जेनेरिक औषधांचे दुकान पेट्रालपर, सेतू केंद्र, भाजीपाला विक्री केंद्र आदींचा समावेश आहे. अडीच ते संगणकीकरणासाठी साडेतीन लाखांचे साहित्य केंद्राकडून सोसायट्यांना मिळणार आहे.

केंद्र सरकारने देशातील सर्व विकास सेवा सोसायट्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून सर्व सोसायट्यांचे संगणीकरण करण्यावर भर दिला जात आहे. यामध्ये एकच सॉफ्टवेअर वापरल जाणार आहे. जेणेकरून देशात कुठेही कोणत्याही विकास सेवा सोसायटीची माहिती ऑनलाइन मिळू शकणार आहे. संगणकीकरणासाठी अडीच ते साडेतीन लाख रुपयांचे संगणक व साहित्य दिले जाणार आहे.

सोसायट्यांना १५० विविध व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे. यातून शेतकऱ्यांच्या या संस्था आर्थिक सक्षम होण्याबरोबरच शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक लाभ होणार आहे. आता लवकरच संगणकीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे.

सोसायट्यांना १५० व्यवसाय करण्याची मुभा देताना त्यांना आर्थिक सक्षम करण्याबरोबरच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यावर भर दिला जात आहे. या १५० व्यवसायांमध्ये कृषीशी संबंधित व्यवसाय, जेनरिक औषधे विक्रीचे दुकान, पेट्रोलपंप, भाजीपाला विक्री केंद्र का सर्व्हिस सेंटर, एटीएम, कृषी रोपवाटिका, ऑइल मिल, शेतकरी प्रशिक्षण, मिनी सुपर मार्केट, आरओ पाणी प्रकल्प, कापड व्यवसाय चिकन, मटण आउटलेट, रुग्णवाहिका सेवा, ई – स्टॅम्ससह मुद्रांक विक्री संगणक प्रशिक्षण, गॅस वितरण एजन्सी, कॅफे रेस्टॉरंट, अंगणवाड्यांना अन्न पुरवठा आदी व्यवसायांचा समावेश असून यातील काही व्यवसायांसाठी काही प्रमाणात अनुदानही उपलब्ध केले जाणार आहे.

पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी असेल, त्यामुळे शेतकयांची आर्थिक उन्नती होण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *