Take a fresh look at your lifestyle.

निरोगी शरीरात शुगर लेवल ला नॉर्मल कधी म्हंटल जातं ?

0

शेतीशिवार टीम, 7 डिसेंबर 2021 : कोरोना महामारीनंतर लोक त्यांच्या आरोग्याबाबत पूर्वीपेक्षा अधिक जागरूक झाले आहेत. लोकांचे लक्ष आता आपापल्या खाण्यापिण्याच्या महिन्याच्या आरोग्य तपासणीकडे अधिक असतं. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी लोक इंटरनेटवर अनेक उपाय शोधताना दिसून येतात.

शुगर लेवल आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अशा परिस्थितीत आज आपण जाणून घेणार आहोत की सामान्य व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी किती असावी आणि पातळी वाढली तर ती कशी कमी करावी ? यासोबतच शरीराला निरोगी ठेवण्यासाठी शुगर लेव्हल नियंत्रित ठेवणं किती महत्त्वाचं आहे…

तुम्हाला मधुमेहाने ग्रस्त आहेत हे कधी समजलं ?

एखाद्या व्यक्तीच्या रक्तात असलेल्या ग्लुकोजच्या प्रमाणाला शुगर लेवल म्हणतात. त्याची वाढ किंवा घट यामुळे मधुमेह होऊ शकतो. बहुतेक लोक मधुमेहाला एक गंभीर आजार म्हणतात, कारण यामुळे आपल्या शरीराचे स्नायू कमकुवत होतात, त्यामुळे शरीरात साखरेचं योग्य संतुलन राखणे फार महत्वाचे आहे. जर साखरेची पातळी 126 पेक्षा जास्त असेल तर ती व्यक्ती मधुमेही असल्याचं मानलं जातं. भारतातील सुमारे 8% लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत…

मधुमेहाच्या बाबतीत शुगर लेव्हलची काळजी घेणे खूप गरजेचं असतं. त्यामुळे इतर अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशननुसार, भारतात दर 100 लोकांपैकी तीन लोकांचा मृत्यू मधुमेहामुळे होतो. सामान्य शुगर लेव्हल 70-140 च्या दरम्यान असावी. यापेक्षा जास्त किंवा कमी असल्यास व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

नॉर्मल शुअर लेव्हल किती असावी ?

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी शुअर लेव्हल जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या शरीरात शुगर बनणे आणि तुटणे यासारख्या प्रक्रिया होत राहतात, त्यामुळे शुअर लेव्हल आणि रेंजचा समतोल राखला जातो. त्याचा नेमका आकडा सांगता येत नाही कारण त्यात कायम चढ-उतार होत राहतात. बहुतेक सकाळी आपली शुअर लेव्हल कमी असते, कारण सकाळी आपण अनुशापोटी असतो, तर अन्न खाल्ल्यानंतर त्याची लेव्हल वाढते आणि संख्या पूर्वीपेक्षा जास्त होते…

अनुषा पोटी शुअर लेव्हल सामान्य मानली जाते, म्हणजे 70 ते 100 दरम्यान असावी.
जेवणानंतर लगेच 170-200 mg/dl पर्यंत शुअर लेव्हल सामान्य असते.
जेवणाच्या 2-3 तासांनंतर रक्तातील साखरेची पातळी 120-140 mg/dl असावी.

नॉर्मल पेक्षा शुअर लेव्हल वाढण्याचे दोन प्रकार आहेत. टाइप-1 आणि टाइप-2 ! ज्याला आपण अशक्त ग्लुकोज सहनशीलता (Impaired glucose tolerance) किंवा प्री-डायबेटिक स्टेज (Pre-diabetic stage) म्हणतो. प्री-डायबेटिक स्टेजच्या रुग्णांची लेव्हल अशी असावी…

जेवणापूर्वी शुअर लेव्हल 101-125 mg/dl
जेवणानंतर लगेच शुअर लेव्हल 190-230 mg/dl
जेवणानंतर 2-3 तासांनंतर शुअर लेव्हल 140-160 mg/dl दरम्यान असते.

**** जर तुमची ब्लड शुअर लेव्हल यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मधुमेहाचा त्रास होऊ शकतो…

जेवणापूर्वी ब्लड शुअर लेव्हल 126 mg/dl पेक्षा जास्त
जेवणानंतर लगेचब्लड शुअर लेव्हल 220-300 mg/dl पर्यंत
जेवणानंतर 2-3 तासांनी ब्लड शुअर लेव्हल 200 mg/dl पेक्षा जास्त

असं असेल तर तुम्हाला मधुमेह झालंच म्हंणून समजा…

ब्लड शुअर लेव्हल कमी करण्याचे मार्ग :-

1. अनेक वेळा मधुमेहामुळे लोक लठ्ठपणाचे शिकार होतात, त्यामुळे शारीरिक व्यायाम करणे हा त्यावर नियंत्रण ठेवण्याचा मुख्य मार्ग आहे. पण जर लेव्हल जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

2. तुमच्या रोजच्या आहारातील साखर आणि कॅफिनचे प्रमाण कमी करा किंवा टाळा, शक्य तितके पाणी प्या. जास्त टेन्शन घेतल्याने ब्लड शुअर लेव्हल कमी होण्याची शक्यता कमी होते.

3. चांगली झोप घेतल्याने आपल्याला ताजेतवाने वाटते असे म्हणतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी विश्रांती अत्यंत आवश्यक आहे.

4. तुमच्या आहारात नवीन काहीही समाविष्ट करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या आहारात अधिकाधिक फायबरचा समावेश करा. या सर्व उपायांनंतरही ब्लड शुअर लेव्हल नियंत्रणात येत नसेल, तर डॉक्टरांकडे जाणे अत्यंत गरजेचे आहे…

मधुमेही रुग्णांनी काय खायला हवं ?

सकाळी उठल्यानंतर :-

* सकाळी उठल्यावर एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा मेथी पावडर टाकून प्या किंवा रात्री मेथी दाणे पाण्यात भिजवून हे पाणी सकाळी गाळून प्या.
* तासाभरानंतर, तुम्ही शुगर फ्री चहा आणि 2-3 बिस्किटे सौम्य गोडवा घेऊन घेऊ शकता.

नाश्ता :-

नाश्त्यासाठी, एक वाटी अंकुरलेले (मोड आलेलं ) धान्य आणि नॉन-स्किम दूध किंवा एक ते दोन वाट्या ओटमील आणि ब्राऊन ब्रेड. तेल नसलेले दोन पराठे आणि एक वाटी दही, गव्हाचे फ्लेक्स आणि क्रीम नसलेलं दूध.

दुपारचं जेवण :-

दुपारच्या जेवणापूर्वी पेरू, सफरचंद, संत्री किंवा पपई खा.
दोन रोट्या, एक छोटी वाटी भात, एक वाटी मसूर, एक वाटी भाजी, एक दही आणि एक प्लेट सलाड खा.

संध्याकाळचं जेवण :-

संध्याकाळच्या स्नॅकमध्ये तुम्ही शुगर फ्री ग्रीन टी आणि हलकी गोड बिस्किटे किंवा कोणताही बेक केलेला नाश्ता घेऊ शकता.
रात्रीच्या जेवणात दोन रोट्या आणि एक वाटी भाजी खा.
झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात एक चतुर्थांश चमचे हळद टाकून प्या.

Leave A Reply

Your email address will not be published.