धक्कादायक ! मुलाचं वय 17 तर, मुलीचं वय अवघं 15 वर्षे, एकमेकांचा हात दोरीने घट्ट बांधला अन्…

0

शेतीशिवार टीम, 09 ऑगस्ट 2021 :- अल्पवयीन प्रेमीयुगुलाची एकमेकांच्या हाताला दोर बांधून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीच्या शिवणी घाटावर घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीससुत्रानुसार, मृतांमध्ये 15 वर्षीय मुलगी ही नववीत शिकत होती तर, 17 वर्षीय मुलगा हा अकरावीत शिकत होता. मूळचे चंद्रपूरचे जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील चिंचोली बुजुर्ग गावात राहणारे हे प्रेमीयुगल 3 ऑगस्टपासून बेपता झालं होते. याबाबतची तक्रार मृताच्या नातेवाईकांनी तक्रार नोंदवल्यानंतर ब्रम्हपुरी पोलिसांनी शोध मोहीम राबविली.

परंतु दोघांनीही एकमेकांच्या हाताला दोर बांधून गडचिरोली येथील आरमोरीच्या पुलावरून वैनगंगा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. त्यादरम्यान आरमोरी तालुक्यातील शिवणी घाटावर दोन मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिासांनी अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना त्यांची ओळख पटली असून दोन्ही कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.