खुशखबर ! ‘या’ जिल्ह्यातील 58 प्रकरणे झाली मंजूर, तरुणांनो, तुम्हीही मिळवू शकता 10 लाखांच्या कर्जावर 3.50 लाख रु. अनुदान, पहा अर्ज प्रोसेस…
केंद्र आणि राज्य शासनातर्फे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना म्हणजे (पीएमएफएमई योजना) देशभर राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रात या योजनेला तरुणांनी मोठा सहभाग घेतला आहे. गेल्या महिन्यात पुणे जिल्ह्यातील 154 प्रकरणे मजूर झाली असून आता यामध्ये जालना जिल्ह्यातही सध्या 58 प्रकरणे मंजूर झाली आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत तरुणांना उद्योजक होण्याची मोठी संधी चालून आली आहे.
जालना जिल्हा मोसंबी फळबाग उत्पादनामध्ये राज्यात अग्रेसर आहे. त्यामुळे केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेअंतर्गत जालना जिल्ह्याचे ‘एक जिल्हा एक उत्पादन’ म्हणुन मोसंबी पिकाची निवड झाली आहे.
जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ‘एक जिल्हा एक उत्पादन’ आधारावर मोसंबी प्रक्रिया उद्योगच नवीन सूक्ष्म खाद्य उद्योग उभारता येणार आहे त्यासाठी वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या 35% किंवा जास्तीत जास्त रुपये 10 लाख अनुदान मिळणार आहे.
या योजनेच्या अनुदानासाठी जिल्ह्यात एकुण दाखल झालेल्या 270 अर्जापैकी 240 अर्ज दाखल करून घेण्यात येवून 183 प्रकरणे बँकेकडे पाठविण्यात आली. त्यातील 45 प्रकरणे नामंजूर तर 58 प्रकरणे मंजूर करण्यात आली.सध्या बँकेकडे 80 प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
शेतकरी उत्पादन गट किंवा संस्था किंवा कंपनी, स्वयंगट, उत्पादन सहकारी संस्था किंवा कंपनीलाही प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान मिळणार आहे. तसेच या योजने अंतर्गत सामाईक पायाभुत सुविधा केंद्राकरीता 35 टक्के अनुदान आणि बँडीग व मार्केटिंगसाठी 50% अनुदान, स्वयं सहाय्यता गटांनी बीज भांडवल, लहान उपकरणे खरेदी करीता रुपये 40 हजार प्रती सभासद असे 4 लाखापर्यंत लाभ मिळेल.
ही योजना ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या आधारवर राबवणे सुरू आहे. या योजनेमध्ये वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक, शेतकरी उत्पादन गट किंवा संस्था किंवा कंपनी, स्वयं सहाय्यता गट, शेतकरी गट, उत्पादन सहकारी संस्था किंवा कंपनी, शासन यंत्रांना आणि खाजगी उद्योग इत्यादी लाभ घेऊ शकतात. सध्या कार्यरत असलेले सूक्ष्म खाद्य उद्योगाची क्षमता किंवा अद्ययावत किंवा स्तर वृध्दी केले जाईल
उदा . भाजीपाला आणि फळे यांची क्लीनींग, वॅक्सींग, पॅकींग ग्रेडींग उद्योग इत्यादी समावेश होतो.
व्दितीय प्रक्रिया उद्योग उदाहरण :- भाजीपाला आणि फळे यांची कमीत कमी प्रक्रिया उद्योग आणि ज्यूस बनवणे, कडधान्य आणि तृणधान्य यांचे पीठ किंवा मुरमुरे, पोहा बनवणे आणि पशु व पक्षी खाद्य प्रक्रीया, तेल बियापासुन तेल काढण्याचा उद्योगाचा समावेश होतो.
तसेच तृतीय प्रक्रीया उदा.. बेकरी, मसाले, नमकीन चिवडा, लोणचे, चकली, पापड, सोयापदार्थ, केळी आणि बटाटा चिप्स, नुडल्स दुधजन्य पदार्थ, मासजन्य पदार्थ, वन उत्पादित खाद्य प्रक्रिया पदार्थ, आळंबीयुक्त पदार्थ, ड्रायफ्रुटसयुक्त पदार्थ जाम, जेली मामलेड, ज्यूस, बिस्कीट, कँडी, टोमॅटो केचप भाजीपाला आणि फळे यांची पावडर आणि त्यापासून तयार केलेले पदार्थ.. ऊसापासु गुळ आणि आवळा कँडी आणि इतर खाद्य पदार्थ उद्योग इत्यादी. प्रक्रिया उद्योग लाभ घेऊ शकतात.
या योजनेचा लाभ वैयक्तिक, शेतकरी उत्पादन गट किंवा संस्था किंवा कंपनी, सव्यंगट, उत्पादन सहकारी संस्था किंवा कंपनी यांनी पीएमएफएमईच्या पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस स्टेप बाय स्टेप खाली दिलेल्या लिंकवर दिली आहे. पात्रता, कागदपत्रे, अटी अन् शर्ती, ऑनलाईन प्रोसेस पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा