शेतकरी मित्रांनो, मोहरीच्या ‘या’ जातीची करा लागवड, बाजारात 10500 रु. प्रतिक्विंटल भाव; 4 चं महिन्यात कमवाल लाखोंचा नफा !
भारतातील जवळपास सर्व घरांमध्ये मोहरीचे तेल खाद्यतेल म्हणून वापरले जाते. भारतात मोहरीची लागवड प्रामुख्याने राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्रात केली जाते. मोहरी लागवडीची खास गोष्ट म्हणजे ती बागायती आणि जिरायती दोन्ही प्रकारच्या जमिनीत केली जाऊ शकते. सोयाबीन आणि पाम नंतर मोहरी हे जगातील तिसरे महत्वाचे तेलबिया पीक आहे. मुख्यतः मोहरीच्या तेलाबरोबरच मोहरीच्या पानांचा भाजी बनवण्यासाठी देखील वापर केला जातो, सोबतच मोहरीच्या चोथ्यापासून पेंडही बनवली जाते, ज्याचा उपयोग दुभत्या जनावरांना खाण्यासाठी केला जातो.
देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोहरीची मागणी वाढल्याने यावर्षी मोहरीला चांगला भाव मिळाला आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने किमान आधारभूत किमतीतही वाढ केली आहे.
मोहरीची लागवड करण्यापूर्वी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी. .
मोहरीची लागवड करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून पिकाचे भरघोस उत्पादन घेता येईल.
1. मोहरी लागवडीसाठीचे हवामान
मोहरी हे भारतातील प्रमुख तेलबिया पिकांपैकी एक आहे, मोहरी हे रब्बी पीक असल्याने मोहरीची पेरणी सप्टेंबरच्या मध्यापासून ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत करावी. मोहरी पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी 15 ते 25 अंश इतक्या तापमानाची आवश्यकता असते.
2. मोहरी लागवडीसाठी योग्य जमीन
मोहरीची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते, परंतु मोहरीचे चांगले उत्पादन घेण्यासाठी सपाट आणि पाण्याचा निचरा होणारी वालुकामय माती सर्वात योग्य आहे, परंतु ती क्षारयुक्त व नापीक जमीन नसावी.
3. मोहरीसाठी शेत कसे तयार करणार
मोहरीच्या लागवडीसाठी भुसभुशीत मातीची गरज असते, सर्वप्रथम शेतजमीन चांगली नांगरून घयावी. नांगरणी केल्यानंतर शेतात ओलावा टिकवून ठेवणे आणि शेत समतल करणे अत्यंत आवश्यक आहे. अश्या प्रकारे लागवड केल्याने सिंचनात वेळ आणि पाणी दोन्हीची बचत होते.
4. मोहरी पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण
मोहरी पिकाच्या पेरणीसाठी ज्या शेतात सिंचनाची पुरेशी साधने उपलब्ध आहेत, त्या शेतात प्रति हेक्टरी ५ ते ६ किलो बियाणे वापरावे. ज्या शेतात सिंचनाची पुरेशी साधने उपलब्ध नाहीत, तेथे मोहरीचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. बियाण्याचे प्रमाण पिकाच्या प्रकारावर अवलंबून असते. जर पिकाचा कालावधी जास्त दिवस असेल तर बियाण्याचे प्रमाण कमी असेल आणि पीक कमी कालावधीचे असेल तर बियाण्याचे प्रमाण जास्त असेल.
5. सुधारित मोहरी वाण
मोहरीच्या लागवडीसाठी त्याच्या सुधारित वाणांचीही माहिती घेणे आवश्यक आहे, जेणेकरून अधिक उत्पादन घेता येईल. बागायती आणि जिरायती क्षेत्रासाठी मोहरीच्या वेगवेगळ्या जाती आहेत.
1. RH 30 हे वाण गहू आणि हरभरा याच्यासोबत आंतरपीक म्हणून बागायत आणि जिरायत अशा दोन्ही ठिकाणी घेणे योग्य आहे.
2. T 59 (वरुणा) : ज्या भागात सिंचनाची साधने उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी हे वाण चांगले उत्पादन देते. T 59 (वरुणा) जिरायती क्षेत्रात हेक्टरी 15 ते 18 क्विंटल उत्पादन देते. याच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण 36 टक्के आहे.
३. पुसा बोल्ड : आशीर्वाद (आरके): जर तुम्हाला लागवडीसाठी उशीर झाला असेल तर हे वाण उशिरा पेरणीसाठी (२५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर) योग्य आहे.
4. NRC एच.बी. (NRC HB) 101 : ज्या भागात पुरेशी सिंचन व्यवस्था आहे तेथे हे वाण चांगले उत्पादन देते. बागायती क्षेत्रामध्ये हे वाण 20 ते 22 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन देतात.
6. मोहरी पिकाचे सिंचन कसे कराल
पूर्ण वाढ झालेल्या मोहरी पिकाला पहिले पाणी 25 ते 30 दिवसांनी आणि दुसरे पाणी शेंगामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत द्यावे. मोहरीत फुलोऱ्याच्या वेळी शेताला पाणी देऊ नये, याची काळजी घ्यावी.
7. खत आणि खतांचा वापर कसा कराल
ज्या शेतात सिंचनाची योग्य साधने उपलब्ध आहेत, त्या शेतात प्रति हेक्टरी 6 ते 12 टन कुजलेले शेण खत, 160 ते 170 किलो युरिया, 250 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 50 किलो म्युरेट आणि पोटॅश आणि 200 किलो जिप्सम पेरणीपूर्वी शेतात मिसळावे. युरियाची अर्धी मात्रा पेरणीच्या वेळी आणि उरलेली अर्धी मात्रा शेतात पहिले पाणी दिल्यानंतर टाकावी. ज्या शेतात सिंचनाची योग्य साधने उपलब्ध नाहीत, त्या शेतात पावसापूर्वी ४ ते ५ टन कुजलेले शेणखत, ८५ ते ९० किलो युरिया, १२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, याप्रमाणे खताचे नियोजन करावे.
8. तणांचे नियंत्रण
मोहरीच्या लागवडीमध्ये पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी दाट गवत शेतातून काढून टाकावे व रोपांमधील परस्पर अंतर 15 सें.मी. ठेवावे, तणांचे निर्मूलन न झाल्यास. पेस्टीसाईड्स चा वापर करून तणांचे नियंत्रण करावे. यासाठी पेरणीनंतर लगेच 2 ते 3 दिवसांनी पेंडीमेथालिन 30 ईसी रसायनाची 3.3 लिटर प्रति हेक्टरी 600 ते 800 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
9. पीक काढणी आणि साठवण
मोहरी पिकामध्ये जेव्हा 75% बियांचा रंग सोनेरी होतो, तेव्हा पीक यंत्राने किंवा हाताने कापून, वाळवून मळणी करून बी वेगळे करावे, नंतर मोहरी चांगली वाळवून नंतरच साठवून ठेवावी.
10. बाजारभाव आणि उत्पन्नातून होणारा नफा
केंद्र सरकारने यावर्षी मोहरीची किमान आधारभूत किंमत (MSP) 150 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटलने 5,200 रुपये इतकी निश्चित केली आहे. गेल्यावर्षी मोहरीची किमान आधारभूत किंमत 5050 रुपये होती. मोहरीची वाढती मागणी आणि तुटवडा यामुळे खुल्या बाजारात मोहरीला किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त भाव मिळत आहेत.
खुल्या बाजारात मोहरीला 6500 ते 10500 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. शेतकरी त्यांचे मोहरीचे पीक देशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये विकू शकतात जिथे त्यांना जास्त भाव मिळू शकतो. याशिवाय तेल प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांशी थेट संपर्क साधूनही थेट कंपन्यांना विक्री करता येते. या वर्षी मोहरीच्या पिकाला चांगला भाव मिळाला आहे. भविष्यातही मोहरीला चांगला भाव मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.