Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी भावांनो मानलं तुम्हाला ! दुग्ध-व्यवसायातून महिन्याकाठी करतायेत लाखोंची उलाढाल, तुम्हीही मिळवा 7 लाखांचे अनुदान, पहा प्रोसेस..

0

शेतकरी काळानुरूप आधुनिक शेतीकडे वाटचाल करीत आहेत. याची उदाहरणे आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतचा असतात. औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी कायम आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात.

केवळ शेती व्यवसायातून म्हणावा तेवढा नफा होत नसल्याने आता बरेच तरुण शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळले असून त्यातून बऱ्यापैकी आर्थिक नफा कमावत आहेत.

दुधड परिसराला लागूनच असलेल्या शेंद्रा औद्योगिक क्षेत्रामध्ये व डीएमआयसीमधील कंपन्यांमध्ये परराज्यातील हजारो कामगार काम करत आहेत. यातील बहुतेक कामगार करमाड व परिसरात वास्तव्यास असून त्यांना भाजीपाला आणि दूध विक्री करून परिसरातील शेतकरी चांगला पैसा कमावतात.

दुधड येथील वैजिनाथ वानखरे व विक्रम वानखरे हे शेतकरी बंधू शेतीबरोबरच जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करत आहेत. यातून ते महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत.

AHIDF योजना 2022 : मेंढ्या / कुक्कुट / डुक्कर / गाय- म्हैस पालनासाठी मिळवा 90% अनुदान !

त्यांनी काही दिवसांपूर्वी वडिलोपार्जित शेतीत डाळिंब लागवड केली होती. यातून त्यांनी सुरुवातीला चांगली आर्थिक उन्नती साधली होती मात्र कालांतराने डाळिंब बागेवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे उत्पन्नात घट होऊ लागली. तसेच फळबागेचे संवर्धन करणे हे देखील जिकरीचे काम आहे. यावर पर्याय म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला.

या व्यवसायात उतरण्यापूर्वी त्यांनी मुक्तसंचार गोठ्याविषयी माहिती गोळा केली. आपल्या जवळ असलेले अडीच ते तीन लाख रुपये खर्च करून त्यांनी मुक्तसंचार गोठा तयार केला. यामध्ये आधीच घरच्या दोन गायी तर होत्याच सोबत विकत घेतलेल्या दोन गायींपासून त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली.

पशुपालकांसाठी शासनाची विशेष योजना। मेंढ्या, कुक्कुट, गाय-म्हैस पालनासाठी 90% अनुदान तर डेयरी प्रॉडक्शन युनिटसाठी मिळवा 10 ते 25 लाखांपर्यंत कर्ज !

दूध विक्रीतून आलेल्या पैशातून अजून आठ गायी विकत घेतल्या असून आता त्यांच्याकडे 20 गायी आणि कालवडी आहेत. दूध डेअरीवर फॅटद्वारे दुधाला प्रतिलिटर 36 ते 45 रुपये इतका भाव मिळतो.

आज त्यांच्याकडे नऊ दुभत्या गायींचे मिळून एकूण 150 लिटर दूध डेअरीवर विक्री करतात. येत्या काळात 200 ते 300 लिटर दूध निघेल, अशी आशा वानखरे बंधूंना आहे. दूध व्यवसाय करण्यासाठी घरातील व्यक्ती राबल्यास नक्कीच नफा मिळतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

तुम्हाला शासनाच्या डेअरी उद्योजक विकास योजनेच्या 7 लाख रु अनुदानाचा फायदा घ्याचा असेल पात्रता, कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज प्रोसेस पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

शासनाची डेअरी उद्योजक विकास योजना

Leave A Reply

Your email address will not be published.