शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्याची मोठी संधी, पहा, कागदपत्रे, PDF फॉर्म, अर्ज प्रोसेस
महाराष्ट्र शासन सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवणे सुलभ व्हावे आणि त्यातून शासनाची महसूल वसुली व्हावी या अनुषंगाने 7/12 सदरी ज्या ठिकाणी भोगवटादार वर्ग 2 असे नमूद आहे त्या जमिनी नजराणा भरून वर्ग 1 करण्याबाबत धोरण राबविण्यात येत आहे.
शासन निर्णय 9 जुलै 2022 नुसार इनाम जमिनी भोगवटादार वर्ग 2 म्हणून वाटप करण्यात आलेल्या होत्या. त्या जमिनीवर शासनाने वेगवेगळ्या अटी आणि शर्ती टाकून त्या वाटप केलेल्या होत्या. जमीन भोगवटदार वर्ग 2 असल्याने या जमिनीवर खरेदी – विक्री, हस्तांतरण, गहाणखत, भाडेपट्टा किंवा इतर कोणतेही व्यवहार करता येत नव्हते.
तसेच या जमिनीवर कर्ज मिळण्यासाठी सुद्धा अडचणी येत होत्या. या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने 9 जुलै 2002 रोजी परिपत्रक काढून यामध्ये सुधारणा केली, या जमिनी भोगवटादार वर्ग 1 करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली. यात इनाम, कुलकर्णी, देशमुख इनाम अशा जमिनींचा समावेश होतो.
यामध्ये देवस्थान आणि गाव मुलकी कामगार वतन म्हणजेच महार वतन, रामोशी वतन यासाठी शासनाने निबंध तसेच ठेवले असून त्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीने सदर जमिनींचे व्यवहार करता येतात.
पाटील, इनाम, कुलकर्णी, देशमुख इनाम भोगवटादार वर्ग 2 जमिनी, वर्ग 1 करण्याची प्रक्रिया तहसील स्तरावरील असून यासाठी जमिनीच्या चालू बाजारभावाच्या रकमेच्या 50% रक्कम शासनाला नजराणा म्हणून भरणे आवश्यक राहणार आहे.
त्यानंतर या जमिनी भोगवटादार वर्ग 1 म्हणून देण्यात येतील. जमिनी भोगवटादार वर्ग 1 झाल्यानंतर त्यावर कोणत्याही प्रकाराचे शासकीय निबंध राहणार नाही, जमिनीची खरेदी – विक्री, हस्तांतरण, गहाणखत, भाडेपट्टा, आणि इतर कोणतेही व्यवहार करता येणार आहे. त्यामुळे या शासकीय योजनेचा शेतकऱ्यांनी फायदा घेण्याचे आव्हान महसूल विभागाकडून जिल्हा – तालुका पातळीवर करण्यात आले आहे.
शेतकरी पुत्रांनो, तुमची जमीन नेमकी कोणत्या वर्गात मोडते, ते जाणून घ्या…
भोगावटा वर्ग 1 :-
जो खातेदार फार पूर्वी पासून जमिनीचा कब्जेदार असून त्याला सदर जमिन विकण्याचा पूर्ण अधिकार बहाल केला आहे. अशा जमीनींचा खातेदाराचा वर्ग 1 मध्ये समावेश होतो. या जमिनी विक्री / हस्तांतरण कामी कोणत्याही शासकीय पूर्वपरवानगीची गरज नाही. थोडक्यात, मुळ मालकीची वडिलोपार्जित आलेली जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये मोडते.
भोगावटा वर्ग 2 : –
ज्या जमिनी खातेदाराला विकण्याचा अधिकार बहाल केला नाही. असा खातेदार म्हणजेच भोगवटादार वर्ग 2 होय. उदा. देवस्थान इमानी जमीन, हैद्राबाद अतियात जमिनी, वतन जमीन, वन जमीन, गायरान, पुन पुनर्वसनाच्या जमीनी व शासनाने दिलेल्या जमिनींचा समावेश होतो. अशा जमीनी विक्री साठी शासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते.
भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर कसे करतात ?
प्रारंभाच्या दिनांकास किंवा भोगवटादारास नवीन व अविभाज्य शर्तीवर / भोगवटादार वर्ग 2 धारण केलेला असा कोणताही भोगवटा, अशा जमिनीच्या चालू बाजाराच्या 50% इतकी रक्कम नजराणा म्हणून शासनाला प्रधान करून भोगवटादार वर्ग एक मध्ये रूपांतर करता येईल.आणि अशा रूपांतरानंतर भोगवटादार , महारास्ट्र जमीन महसूल सहिता 1966 याच्या तरतुदी अशी जमीन भोगवटादार वर्ग 1 म्हणून धारण करील.
भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
जमिन मालक यांचा विनंती अर्ज
विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र
जमिनीचा 50 वषाचा उतारा व खाते उतारा
7/12 उताऱ्यावर सर्व फरफार नोंदी
एकत्रीकरणाचा मूळ उतारा
आकारबंदाची मुळ प्रत
मुळधारकास जमिन कशा मिळाला याबाबत कबुलायत / आदेशाची नक्कल
तलाठी यांचेकडील वन जमीन नोंदवहीचा उतारा.
भोगवटादार वर्ग -2 चे वर्ग – 1 मध्ये अंतर्भाव करण्यासाठी करावयाचा अर्जाचा नमुना संच :-
अर्जाचा नमुना संच पाहण्यासाठी PDF :- इथे क्लिक करा