आधुनिकतेकडे प्रवास करणाऱ्या या जगात टिकून राहण्यासाठी शेतकरी बांधवांना आपल्या शेती करण्याच्या पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे आणि हीच गोष्ट ओळखून महाराष्ट्रातील अनेक शेतकरी बांधव आपल्या शेती करण्याच्या पद्धतीत अनेक नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत वेगवेगळे प्रयोग करत आहेत आणि त्याचा त्यांना फायदा देखील मिळत आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या शेतीमध्ये वापर केल्यास राज्यातील शेतकरी अत्यंत अल्प खर्चात आणि अल्प कालावधीत अतिशय भरघोस नफा शेती करून घेऊ शकतो.

आणि याच गोष्टीचे मूर्तीमंत उदाहरण आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात पाहायला मिळत आहे तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने केवळ दहा गुंठ्यांमध्ये भाजीपाला पिकाच्या माध्यमातून लाख रुपयांची कमी करून दाखवली आहे केवळ दहा गुंठ्यात लाखो रुपये का होणाऱ्या या युवा शेतकऱ्याचे पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण तालुका पातळीवर चर्चा होताना दिसत आहे.

हे पण वाचा 

Aurangabad – Pune Expressway सुसाट, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नवीन घोषणा

शिरूर येथील युवा शेतकरी राहुल औटी आणि सोमनाथ औटी यांनी आपल्या दहा गुंठे खडकाळ जमिनीवर आधुनिक तंत्रज्ञान वापरत भाजीपाला शेती फुलवून दाखवले आहे.

वालवड या पिकाची ओळख अल्प कालावधीत आणि अल्प खर्चात येणारे पीक अशी आहे ही गोष्ट लक्षात घेऊन राहुल आणि सोमनाथ या दोन्ही बंधूंनी आपल्या शेतामध्ये वालवाडाची शेती करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी आपल्या दहा गुंठ्यातील शेत जमिनीची उभी आणि आडवी नांगरणी केली त्यानंतर त्यामध्ये वाफे तयार करण्यात आले त्यात वालाची बियाणे लावण्यात आले.

पाण्याची टंचाई भासू नये आणि पाण्याची बचत देखील व्हावी या हेतूने त्यांनी सिंचनासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला यामुळे पाण्याचे नियोजन यामुळे अत्यंत कमी पाण्यामध्ये सिंचनाची सोय करण्यात आली.

हे पण वाचा 

Aurangabad – Pune Expressway सुसाट, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नवीन घोषणा

ठिबक सिंचनामुळे पाण्याचा अपव्यय तर टाळता आलाच शिवाय वालवाडासाठी लागणारी खते विद्राव्य खतांच्या स्वरूपात ठिबक सिंचन च्या माध्यमातून थेट रोपांच्या मुळापर्यंत पोहोचले गेले वाल हे एक वेलवर्गीय पीक असल्यामुळे त्यासाठी राहुल यांनी मांडव करण्याचे ठरवले त्यासाठी त्यांनी लोखंडी तारा आणि लाकूड यांचा वापर करून मांडव तयार केले आणि वेल मंडपावर पसरवले मध्यंतरी सातत्याने होणाऱ्या रिमझिम पावसामुळे वाल पिकांवर मोठा विपरीत परिणाम झाला होता मात्र त्यांनी योग्य त्रिकाजी घेत वाल पिकाला नवी जीवनदान दिले त्यासोबतच किडींच्या प्रादुर्भावापासून वाचवण्यासाठी वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी देखील करण्यात आली

दहा गुंठ्यातील वालवडच्या या शेतीसाठी त्यांना एकूण 15000 रुपये इतका खर्च आला वालवड्याच्या पिकाला त्यांना 60 ते 70 रुपये प्रति किलो असा बाजारभाव मिळत आहे त्यामुळे त्यांना वॉल पिकातून एक लाखापर्यंत चा नफा मिळण्याची अपेक्षा आहे सोमनाथ औटी हे केवळ शेतकरीच नाही तर एक राजकीय व्यक्ती देखील आहे ते गावचे उपसरपंच आहेत मात्र केवळ राजकारणातील बडे जाऊ मला किंवा सचिन मीरा न करता न दाखवता ते स्वतः शेती करून शेतीची आवड जपत त्यातून मिळवलेले उत्पन्न नक्कीच कौतुकास्पद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *