केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा एकदा वाढ होणार आहे. सोमवार 31 जुलै 2023 च्या AICPI निर्देशांकाचे आकडे प्रसिद्ध झाले आहेत. याकडे देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होतं. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार (AICPIN इंडेक्स), महागाई भत्ता आणि महागाई रिलीफ चार टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे महागाई भत्ता 42 वरून 46 टक्के झाला आहे. या निर्णयानंतर राज्य सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणार आहे, कारण राज्य सरकारे सरकार केंद्र सरकारप्रमाणेच महागाई भत्ता देत आहे.

केंद्र सरकारने सर्वप्रथम आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होणार आहे. यानंतर राज्ये सरकारेही आपल्या साडेआठ लाख कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्त्याचा लाभ देणार आहे.

June AIPCI Index मध्ये मोठी वाढ..

जून 2023 AICPI निर्देशांकाचे आकडे आले आहेत. निर्देशांकात मोठी उसळी आली आहे. जून निर्देशांक 136.4 अंकांवर पोहोचला आहे. मे महिन्यात निर्देशांक 134.7 अंकांवर होता. जूनमध्ये एकूण 1.7 अंकांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मे महिन्याच्या आकडेवारीनुसार, एकूण DA स्कोअर 45.58 टक्के होता, जो जून 2023 मध्ये वाढून 46.24 टक्के झाला आहे. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात सरकारकडून याची घोषणा होऊ शकते..

महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी झाली वाढ..

केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किती वाढ करणार आहे, हे ठरलं आहे. सध्या 42 टक्के महागाई भत्ता दिला जात असून त्यात आणखी चार टक्क्यांची वाढ शक्य होती. जानेवारी ते जून 2023 पर्यंतच्या निर्देशांकाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की, यामध्ये 4 टक्के महागाई भत्ता वाढवला जाणार आहे.

चार टक्क्यांनी वाढल्यानंतर महागाई भत्ता 46 टक्क्यांवर पोहोचेल. सप्टेंबर 2023 मध्ये त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे असे मानले जाते. जर चार टक्के महागाई भत्ता जाहीर झाला, तर जुलै 2021 पासून आतापर्यंत एकूण 15 टक्के महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.

HRA मध्येही होणार वाढ..

येथे, सातव्या वेतनश्रेणीनुसार दिलेला घरभाडे भत्ता (HRA) वरही महागाई भत्ता प्रभावित होईल. यातही वाढ होईल. सध्या X, Y आणि Z या तीन श्रेणींमध्ये HRA दिला जातो. शहरांनुसार दिले जाते. या वाढीनंतर X शहर श्रेणीतील शहरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक HRA मिळेल. सध्या X ला 27 टक्के, Y ला 18 टक्के आणि Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 9 टक्के HRA दिला जातो. जेव्हा महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे जाईल, तेव्हा HRA देखील अनुक्रमे 30 टक्के, 20 टक्के आणि 10 टक्क्यांनी वाढेल.

पगारात किती होणार वाढ..

सरकारी कर्मचार्‍यांच्या डीए (केंद्रीय सरकारी वेतन कॅल्क्युलेटर) बद्दल बोलायचे तर, 18,000 रुपये मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्याला 42 टक्के म्हणजे 7560 रुपये महागाई भत्ता दिला जातो. त्यात 4 टक्के वाढ केली, तर दरमहा 8280 रुपये होतील. त्यानुसार 4 टक्के महागाई भत्त्यात 720 रुपयांची वाढ होणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार दरमहा 56 हजार 900 रुपये असेल तर त्याला 2276 रुपयांची वाढ मिळेल. तर 27312 रुपयांची वार्षिक वाढ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *