लोकांना आता पराठा खाणे महागात पडू शकतं. खरंतर, गुजरात अपील अथॉरिटी फॉर ॲडव्हान्स रुलिंग (GAAR) ने गुजरात ॲडव्हान्स अथॉरिटी ऑफ रुलिंग (GAAR) चा निर्णय कायम ठेवला आहे. ज्यामध्ये त्यांनी पॅकबंद पराठ्यांवर 18% वस्तू आणि सेवा कर (GST) दर लागू होणार असल्याचे सांगितलं होतं. वाडीलाल इंडस्ट्रीजने (Vadilal Group) दाखल केलेल्या अर्जावर गारचा (GAAR) निर्णय आला.
वाडीलाल इंडस्ट्रीजने GAAR कडे दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं होतं की, ते मलबार, मिक्स व्हेज आणि प्लेनसह आठ प्रकारचे पराठे तयार करतात. सर्व प्रकारांचा प्रमुख घटक म्हणजे गव्हाचे पीठ.
त्यामुळे या सर्वांवर रोटीप्रमाणेच कर आकारला जावा. भाजीपाला, कांदे किंवा मेथी यांसारखे इतर पदार्थ फक्त चवीपुरते जोडले जातात, असे कंपनीने म्हटलं आहे. नाहीतर पराठ्याचे सर्व प्रकार सारखेच असतात.
GAAR ने ओळखलं की, पराठे खाण्यासाठी तयार नसले तर त्यांना तीन-चार मिनिटे शिजवावे लागतात. पण ते रोटी किंवा चपाती सारखे नसतात. जे प्रामुख्याने गव्हाच्या पिठाचे पदार्थ आहेत. त्यानंतर प्राधिकरणाने पराठे दुसऱ्या वर्गीकरणात येतील असा निर्णय दिला होता. पराठ्यांवर 18% GST लागू होणार आहे. त्यानंतर वाडीलाल GAAR कडे वळले.
रोटी, चपाती आणि नान वर 5% GST आणि पराठ्यावर 18% GST लावण्यात आला आहे. यासंदर्भात अनेक पक्षांनी ॲथॉरिटी ऑफ ॲडव्हान्स रुलिंग (AAR) कडे दाद मागितली आहे.
जी केंद्र सरकारच्या GST कराशी संबंधित बाबी पाहते. AAR नुसार चपाती, रोटी आणि पराठा वेगळे आहेत. रेडी फूडवर 5% GST आणि रेडी टू इट 18% GST लागू होतो. असं त्यांचं म्हणणं आहे, त्यामुळे केंद्र सरकारनेही 18% GST लावण्यास परवानगी दिली आहे.
याचा अर्थ, रोटी आणि नान थेट दुकानातून खरेदी आणि खाऊ शकतात. तर, पॅकेटमध्ये विकले जाणारे पराठे काही मिनिटे शिजवल्यानंतर खाल्ले जाऊ शकतात. त्यामुळे पराठ्यांवर 18% GST लावण्यात आला आहे.
मात्र, पिझ्झा ब्रेडवर 5% GST आकारला जातो. तर ते वापरण्यापूर्वी गरम करून शिजवावे लागते. 5% GST फक्त दुकानातून खरेदी केलेल्या रेडी टू इट खाद्यपदार्थांवर लागू आहे. पिझ्झा, ब्रेड, रस्क, टोस्टेड ब्रेड इत्यादींचा समावेश आहे.