Take a fresh look at your lifestyle.

पुणे – अहमदनगरातील शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड ; 50,000 रु. होणार जमा, पहा गावानिहाय PDF लिस्ट, e-KYC साठी लास्ट डेट पहा !

0

शेतीशिवार टीम : 14 ऑक्टोबर 2022 :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी पोर्टलवर गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील 75 हजार, 682 लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश असून संबंधीत शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरणासाठी 18 ऑक्टोबर 2022 पर्यंतची मुदत देण्यात आली.

यानंतर संबंधीत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 50,000 हजार रुपयांपर्यंतची मदत थेट जमा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी / उपनिबंधांमार्फत देण्यात आली आहे.

सदरच्या याद्या ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास सोसायटी, C.S.C सेंन्टर / आपले सरकार सेवा केंद्र, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालयात शेतकऱ्यांना पाहण्यास मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे.

यादीमध्ये नाव असलेल्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी कुठलाही विलंब न लावता 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत जवळचे आपले सरकार केंद्र / C.S.C सेन्टर किंवा बँक शाखेत जावून आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या सेव्हींग खात्यावर शासनाकडूल लाभाची रक्कम बँक खात्यावर क्रेडिट होणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील 1 लाख 85 हजार 795 इतक्या खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे. त्यापैकी पहिल्या यादीमध्ये एकूण 75 हजार 642 इतक्या लाभार्थ्यांची नावे समाविष्ट आहेत.

उर्वरीत पात्र लाभार्थ्यांच्या याद्या यापुढे शासनाकडून वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी योजना संपण्यापूर्वी विनाविलंब आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

आधार प्रमाणीकरण न केल्यास प्रोत्साहनपर अनुदान लाभाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणार नाही. आधार प्रमाणिकरण न झाल्यास आधार प्रमाणिकरण शक्य नाही हा पर्याय निवडून तक्रार करता येईल. सदर तक्रारींचे निराकरण तालुकास्तरीय व जिल्हा समितीमार्फत करण्यात येईल.

आधार नंबर किंवा रक्कम चुकीची असल्यास आधार अमान्य किंवा रक्कम अमान्य हा पर्याय निवडून तक्रार जनरेट करावी व मिळणारी पावती स्वतःकडे ठेवावी. एकापेक्षा जास्त कर्ज खाती असल्यास सर्व खात्यांचे आधार प्रमाणिकरण केल्यानंतर रक्कम लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणार आहे. मयत लाभार्थ्यांच्या वारसांना बँकमध्ये जावून त्यांची वारसनोंद करून घेण्याची आहे, तसेच ज्यांनी आपले बँक खात्यास आधार क्रमांक लिक केलेला नाही त्यांनी तात्काळ आपले आधार लिंक करून घेण्यासाठी गावातील जिल्हा बँकेच्या शाखेत मदत कक्ष सुरु करण्यात येणार आहे.

कर्जमाफी यादी महाराष्ट्र 2022 PDF Download

नगर जिल्ह्यातील 50,000 रु. यादी गावनिहाय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

पुणे जिल्ह्यातील 50,000 रु. यादी गावनिहाय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

संभाजीनगर जिल्ह्यातील 50,000 रु. यादी गावनिहाय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

कोल्हापूर जिल्ह्यातील 50,000 रु. यादी गावनिहाय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

बीड जिल्ह्यातील 50,000 रु. यादी गावनिहाय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.