तुमचेही IAS किंवा IPS होण्याचे स्वप्न असेल तर तुम्हाला देशातील सर्वात कठीण परीक्षा पास करावी लागते. UPSC द्वारे दरवर्षी नागरी सेवा परीक्षा (Civil Services Exam) घेतली जाते. यामध्ये लाखो विद्यार्थी सहभागी होतात. काही जण प्री-मेन (Pre-mens) पास करून इंटरव्हिव्हच्या राउंड पर्यंत पोहोचतात. पण इंटरव्हिव्हमध्ये विचारलेले असे प्रश्न असतात की ते ऐकून अनेकांना घाम फुटतो. हे प्रश्न तर सोपे असतात परंतु त्यांची उत्तरे फक्त तेच उमेदवार देऊ शकतात ज्यांचे मन आणि सामान्य ज्ञान (General Knowledge) चांगले आहे. तुमचीही IQ लेव्हल खूपचं चांगली आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हे प्रश्न एकदा नक्की पहा…
प्रश्न – बरं मला सांगा की, जर कोणी अंतराळात (Space) गेला अन् त्याला जर ढेकर आला तर काय होईल ?
उत्तर – General Knowledge च्या या प्रश्नाच्या उत्तरावर तुमचीही बोलती बंद होईन परंतु या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे. तसं पाहिलं तर ,अंतराळात (Space) गुरुत्वाकर्षण नसतं, त्यामुळे अंतराळात ढेकर येऊच शकत नाहीत. कारण, गुरुत्वाकर्षण नसल्याने अंतराळात पोटातील गॅसपासून लिक्विड वेगळं होतं. त्यामुळे अंतराळात ढेकरचं येऊ शकत नाही…
प्रश्न – असा कोणता जीव आहे, जो एकावेळी 2 हजार फुग्यांएवढा श्वास घेत अन् तेवढाच सोडतो ?
उत्तर – ब्लू व्हेल हा असा जीव आहे, जो एकावेळी दोन हजार फुग्यांएवढा श्वास घेतो आणि तेवढाच श्वास सोडतो.
प्रश्न – जगातला असा कोणता देश आहे, ज्याचा ध्वज आयाताकृती नाही अन् चौकोनीही नाही ?
उत्तर – जर तुमच्याकडे देश आणि जगाची माहिती असेल तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर सहज देऊ शकता. जर उत्तर येत नसेल तर त्याच उत्तर ‘नेपाळ देश’ आहे ज्याचा ध्वज आयाताकृती नाही अन् चौकोनीही नाही..
प्रश्न – आपल्या शरीराचा असा कोणता भाग आहे, जिथे रक्ताचा एक अंशही पोहचत नाही?
उत्तर – कॉर्निया (डोळ्याचा पारदर्शक भाग) हा आपल्या शरीरातील एकमेव भाग आहे जिथे रक्तपुरवठा होत नाही. हा एक अवयव आहे जो थेट हवेतून ऑक्सिजन घेतो.
प्रश्न – दात पाहून घोडा आहे की घोडी हे सांगता येईल का ?
उत्तर – हा प्रश्न ऐकून तुम्हाला तर घाम फुटू शकतो. परंतु हे खरे आहे, दात पाहून घोडा आहे की घोडी हे तुम्ही सांगू शकता. तर घोड्यामध्ये 40 दात आढळतात, तर घोडीमध्ये 36 दात आढळतात.
प्रश्न- इंग्रजीतला असा कोणता शब्द आहे, शेवटची चार अक्षरे काढून टाकली तर त्याच्या उच्चारात काही फरक पडणार नाही ?
उत्तर – होय, इंग्रजीला तो शब्द आहे Queue. हा एकमेव शब्द आहे ज्याचा शेवटची चार अक्षरे काढून टाकल्यानंतर उच्चार सारखाच राहतो, विश्वास बसत नसेल तर तुम्हीच पहा.