Good News : शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रु. जमा व्हायला सुरुवात ; दुसऱ्या यादीत ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ, पहा e-KYC प्रोसेस !
तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना आजपासून प्रोत्साहन अनुदान देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या यादीत जिल्ह्यातील अवघे 40% शेतकरी पात्र ठरले असून, पोर्टलवर यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आधार प्रमाणिकरण केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर ही अनुदान रक्कम जमा होणार आहे.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकाने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदान योजना जाहीर केली होती; परंतु तीन वर्षांपासून प्रामाणिक शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप करण्यासाठी मुहूर्त मिळत नव्हता.
अनेक कारणांनी याला चालढकल सुरू होती. या प्रोत्साहन अनुदानासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 3 लाख 1 हजार 264 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलद्वारे शासनाला देण्यात आली होती; मात्र पहिल्या यादीत केवळ 1 लाख 19 हजार 260 शेतकरी पात्र ठरले आहेत.
उर्वरित यादीमधील काही शेतकऱ्यांचे बँक खाते बंद असणे किंवा खाते नंबर बदलणे अशा विविध कारणांनी त्यांचा समावेश झालेला नाही. त्रुटीची पूर्तता झाल्यानंतर दुसऱ्या यादीत त्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे .
13,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा :-
प्रोत्साहन अनुदानाची यादी जाहीर केल्याबरोबर जिल्ह्यातील 13,000 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केल्यानंतर त्याच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाल्याचेही जिल्हा उपनिबंधक शिंदे यांनी सांगितले.
आधार प्रमाणिकरण मोफत :-
जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत जिल्ह्यातील यादी जाहीर केली. ज्या पात्र शेतकऱ्यांची पहिल्या यादीत नवे नाही अशा शेतकऱ्यांची दुसरी यादीही लवकरच प्रसिद्ध होणार आहे. प्रोत्साहन अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यासाठी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांच्या सर्व शाखा, महा ई सेवा केंद्र व आपले सरकार या ठिकाणी मोफत प्रमाणिकरण करण्यात येणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. कोणी शुल्क घेतले तर आपल्याकडे तक्रार करावी, असेही त्यांनी सांगितले.
तालुकानिहाय पात्र शेतकऱ्यांची सख्या :-
शिरोळ – 14715
शाहूवाडी 3838
राधानगरी – 11706
पन्हाळा – 11529
करवीर – 20678
कागल – 12847
हातकणंगले – 12086
गडहिंग्लज – 9594
चंदगड – 12852
भुदरगड – 8907
गगनबावडा 2270
आजरा – 8117
कोल्हापूर – 121
एकूण :- 1,21,260
कोल्हापूर जिल्ह्यातील 50,000 रु. यादी गावनिहाय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा
ज्या गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरु आहेत अशा गावातील पात्र शेतकऱ्यांना वगळण्यात आलं आहे. या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार आहे.
त्या गावांची नावे जिल्हानिहाय पाहूया :-
पालघर जिल्हा – डहाणू -65, विक्रमगड-36, वसई-11 जवाहर-47, मोखोडा -22 पालघर-83, तळासरे- 11 वाडा-70 एकूण – 342 गावे
ठाणे जिल्हा – कल्याण-7, अंबरनाथ-1, ठाणे-5, भिवंडी-31, मुरबाड-35, शहापूर-79 एकूण – 158 गावे
रायगड जिल्हा :- 20 गावे
रत्नागिरी :- 51 गावे
नाशिक :- 194 गावे
नंदुरबार :- 206 गावे
पुणे :- 2 गावे
सातारा :- 16
कोल्हापूर :- 4 गावे
नागपूर :- 17 गावे
वर्धा :- 103
चंद्रपूर :- 09
भंडारा :- 19
गोंदिया :- 10
एकूण :- 11, 66 गावे