महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले कर्जमुक्ती अभियान योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली होती, अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन लाभ म्हणून देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता.
त्याचाच भाग म्हणून नियमित कर्जफेड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या नावावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने 50 हजार रुपये रक्कम जमा झाली होण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच विशिष्ट क्रमांक प्राप्त होईल व त्यांना लाभाची रक्कम मिळेल.
सर्व संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी आपापल्या गावात सेवा सोसायटीच्या सचिवांकडे याबाबत सविस्तर माहिती घ्यावी व संबंधित बँक शाखेत आपले आधार प्रमाणिकरण करून घेणे गरजेचे आहे. आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर बँक खात्यात 24 तासांत पैसे जमा होत आहे.
परंतु राज्यातील तब्बल 1166 गावांची नावे यादीतून गायब झाली आहे. तर अशा शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. अशा शेतकऱ्यांच्या गावात ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया चालू असल्याने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे 17 तारखेला मतदान झाल्यानंतर 18 किंवा 19 तारखेला दुसरी यादी प्रकाशित होणार आहे.
त्या गावांची नावे जिल्हानिहाय पाहूया :-
पालघर जिल्हा – डहाणू -65, विक्रमगड-36, वसई-11 जवाहर-47, मोखोडा -22 पालघर-83, तळासरे- 11 वाडा-70 एकूण – 342 गावे
ठाणे जिल्हा – कल्याण-7, अंबरनाथ-1, ठाणे-5, भिवंडी-31, मुरबाड-35, शहापूर-79 एकूण – 158 गावे
रायगड जिल्हा :- 20 गावे
रत्नागिरी :- 51 गावे
नाशिक :- 194 गावे
नंदुरबार :- 206 गावे
पुणे :- 2 गावे
सातारा :- 16
कोल्हापूर :- 4 गावे
नागपूर :- 17 गावे
वर्धा :- 103
चंद्रपूर :- 09
भंडारा :- 19
गोंदिया :- 10
एकूण :- 1166 गावे