Take a fresh look at your lifestyle.

दिवाळीपूर्वी सर्वात मोठी बँक SBI चा ग्राहकांना झटका ; उद्यापासून तुमच्या EMI मध्ये होणार मोठी वाढ, पहा नवे दर…

0

दिवाळीपूर्वी देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI ने व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स (MCLR) 25 बेस पॉइंट्सने वाढवले ​​आहेत. नवीन व्याजदर 15 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, रात्रीचा MCLR 7.35 टक्क्यांवरून 7.60% करण्यात आला आहे. एक महिन्याचा MCLR 7.35 टक्क्यांवरून 7.60%, तीन महिन्यांचा MCLR 7.35 टक्क्यांवरून 7.60%, सहा महिन्यांचा MCLR 7.65 टक्क्यांवरून 7.90% करण्यात आला आहे.

दिवाळीपूर्वी EMI चा वाढणार बोजा :-

एक वर्षाचा MCLR 7.70 टक्क्यांवरून 7.95% आणि दोन वर्षांचा MCLR 7.90 टक्क्यांवरून 8.15% करण्यात आला आहे. MCLR वाढल्याने बँकेची सर्व कर्जे महाग होणार आहेत. जर तुम्ही स्टेट बँकेकडून कार लोन, होम लोन घेतलं असेल तर तुमचा EMI पुढील महिन्यापासून वाढेल. दिवाळीपूर्वी तुमच्या खिशाला हा मोठा धक्का बसणार आहे.

बचतीवरील व्याजदरातही करण्यात आली वाढ :-

बँकेने बचतीवरील व्याजदरातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर 15 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, सध्या 10 कोटींपेक्षा कमी बचतीवर 2.75% व्याजदर आहे, तो 2.70% करण्यात आला आहे. 10 कोटी रुपये आणि त्यावरील बचतीवरील व्याजदर 2.75 टक्क्यांवरून 3% करण्यात आला आहे.

मुदत ठेवीवरही वाढवला इंट्रेस्ट रेट :-

मुदत ठेवींवरील व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे. नवीन दर 15 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉइंट्सचा अतिरिक्त लाभ मिळेल. 7-45 दिवसांच्या FD वरील व्याजदर 2.90 टक्क्यांवरून 3% करण्यात आला आहे.

46 दिवस ते 179 दिवसांसाठी 4%, 180-210 दिवसांसाठी 4.65%, 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 4.70%, 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.60%, 2 वर्षे ते 3 5.65% वर्षांहून कमी, 3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.80%, 5 वर्षे ते 10 वर्षांसाठी 5.85% पूर्वीच्या 5.65% होती. ज्येष्ठ नागरिकांसाठी किमान व्याजदर 3.50% आणि कमाल व्याजदर 6.65% करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.