Take a fresh look at your lifestyle.

देशात महागाईचा भडका ; महागाई आणि बेरोजगारी ही वाढणार !

0

शेतीशिवार टीम, 17 मार्च 2022 : कोरोना महामारीच्या आर्थिक परिणामातून सावरलेल्या सर्वसामान्यांना आता रशिया – युक्रेन युद्धामुळे वाढत्या महागाईचा फटका बसू लागला आहे. या युद्धामुळे कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. आता कंपन्यांनी ही हा वाढता बोजा ग्राहकांवर टाकण्यास सुरुवात केली आहे.

दुधा पासून मॅगीच्या दरांमध्ये मोठी वाढ…

कंपन्यांनी पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे. हे नेस्ले इंडिया (Nestle India), हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) आणि दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या कंपन्यांनी सुरू केलं आहे. नेस्लेने मॅगीच्या किमती 9 ते 16 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. तसेच, HUL ने विविध कॉफी उत्पादनांच्या किमती 1.5 ते 14 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. अमूल, पराग आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे.

पंधरा दिवसांत चिकनचे भाव 50 टक्क्यांनी वाढले :-

किरकोळ बाजारात गेल्या 15 दिवसांत चिकनचे दर 40 टक्क्यांनी वाढले असून ते 180 रुपये किलोवरून 280 रुपये किलो पर्यंत पोहचले आहेत. त्याचप्रमाणे बटाट्याच्या दरात ही 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

तज्ज्ञांचे असं म्हणणं आहे की, युद्ध असेच सुरू राहिलं, तर महागाई वाढवण्यासाठी जे काही उपाय योजले जातील, त्याच्या परिणामामुळे बेरोजगारीसारख्या समस्या वाढणे साहजिकच आहे. यामुळे कोरोनानंतर हळूहळू वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या गतीला बाधा येऊ शकते. भारत आपल्या गरजेच्या 85% कच्च्या तेलाची आयात करत आहे.

एका महिन्यात खाद्यतेलाच्या किमतीत 30% वाढ…

शेंगदाणा तेल 15 फेब्रुवारीला 173.40 रुपये आणि 17 मार्चला 190.49 रुपये होते. एकूण 8.66 टक्के वाढ.. .
मोहरीचे तेल 15 फेब्रुवारीला 188.06 रुपये आणि 17 मार्चला 210 .44 रुपये होते, एकूण 12.26 टक्के वाढ झाली.

15 फेब्रुवारीला सोयाबीन तेल 140.95 रुपये प्रति किलो होतं ते 16 मार्चला 175.88 रुपयांपर्यंत पोहचलं आहे. त्यात 15.46 टक्क्यांनी वाढ झाली.
सोया तेल 15 फेब्रुवारीला 146.87 रुपये प्रति किलो आणि 16 मार्चला 162.27 रुपये होते. यामध्ये महागाई 10.48 टक्क्यांनी वाढली आहे.

सूर्यफूल तेल 15 फेब्रुवारीला 148.90 रुपये प्रति किलो होतं ते 15 मार्चला 18.70 टक्क्यांनी वाढून 176.75 रुपये झालं आहे.
पामतेलही 17.39 टक्क्यांनी वाढून 130.87 वरून 153.64 रुपये प्रति किलोवर पोहचलं आहे.
स्रोत : ग्राहक व्यवहार विभाग, अन्न आणि सार्वजनिक वितरण.

तज्ज्ञांचं काय आहे म्हणणं…

शेतकऱ्यांना बसणार महागाईचा मोठा फटका…  

या युद्धाचा सर्वाधिक परिणाम भाज्यांच्या दरावर होणार आहे. भाजीपाला उत्पादनात वापरल्या जाणार्‍या पोटॅश या खताच्या जागतिक पुरवठ्यापैकी 65% रशिया आणि युक्रेनमधून येतो. भारत सुमारे 3 दशलक्ष टन पोटॅश आयात करतो. त्यापैकी 17% पोटॅश आणि 60% एनकेपी (NKP) म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम ही खते रशियातून आयात केली जातात.

युद्धामुळे तेथील प्रॉडक्शनवर परिणाम होत असून देशाला होणाऱ्या पुरवठ्यावरही परिणाम होणार आहे. रशिया-युक्रेन-बेलारूसकडून या पुरवठ्याचा पर्याय लवकरच शोधला गेला नाही तर भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. प्रणव सेन, आर्थिक व्यवहार तज्ज्ञ

रिझव्‍‌र्ह बँकेने कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल $ 70 या महागाईचा अंदाज व्यक्त केला होता, परंतु तेव्हापासून ती सरासरी $ 30 च्या आसपास वाढली आहे. अशा स्थितीत पेट्रोल-डिझेलचे दर वाढले तर महागाईही वाढणार आहे. तसेच रिझर्व्ह बँकेला व्याजदरात वाढ करावी लागणार आहे.

वाढत्या व्याजदराचा परिणाम घर खरेदीदारांवर सर्वाधिक दिसून येईल. त्यांना कर्जावर अधिक व्याज द्यावे लागणार आहे. त्याच वेळी, डिझेलच्या किंमतीमुळे, पुरवठा साखळी महाग होईल, ज्यामुळे साहजिकच प्रत्येक उत्पादनाची किंमत वाढेल. महागाईमुळे अल्प उत्पन्न गटातील लोकांचे उत्पन्न खाणे, पिणे, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवरच खर्च होणार असून, मागणी वाढण्यास ते हातभार लावू शकणार नाहीत.

मदन सबनवीस, मुख्य अर्थतज्ज्ञ, बँक ऑफ बडोदा

Leave A Reply

Your email address will not be published.