Take a fresh look at your lifestyle.

लॉन्च होताच 50000 बुकिंग मिळवलं, आता ‘या’ नव्या पॅकेजची दिली ऑफर, ग्राहकांना मिळणार ‘हे’ फायदे…

0

शेतीशिवार टीम, 17 मार्च 2022 : किया कॅरेंस (Kia Carens) बाबत, कंपनीने ग्राहकांसाठी ‘My Convenience Plus’ प्रोग्रॅम सादर केला आहे. यामध्ये, कॅरेंस (Carens) खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मेंटेनेंस, एक्सटेंडेड वॉरंटी, रोड साइड असिस्टेंस कवर अशा पॅकेजची ऑफर देत आहे. ग्राहक प्रीमियम आणि लक्झरी पॅकेजमधून ही निवड करू शकतात, जे 4 आणि 5 वर्षांसाठी कव्हरेज देतं.

याआधी, अलीकडेच, या नवीन वाहनाबद्दल माहिती देताना, कंपनीने सांगितलं होतं की, Kia Carens ने 14 जानेवारीपासून 2 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 50000 बुकिंग मिळवले आहेत.

Kia ने आपली चौथी कार Carens या वर्षी 15 फेब्रुवारी रोजी भारतीय बाजारात लॉन्च केली. दक्षिण कोरियाच्या कार कंपनीने या कारच्या बुकिंगबद्दल सांगितलं की, तिची 42% बुकिंग टियर 3 शहरांमधून झाली आहे. या कारचे लक्झरी आणि लक्झरी प्लस व्हेरियंट ग्राहकांच्या पसंतीत उतरलं आहे. यामध्ये त्यांचे बुकिंग योगदान 43 % आहे.

Carens च्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटची मागणी सारखीच आहे, पेट्रोलच्या 50 टक्के ग्राहकांनी Carens च्या डिझेल व्हेरियंटची ही बुकिंग केली आहे. शिवाय, कारच्या ऑटोमेटिक व्हेरियंटने जवळपास 30% ग्राहकांना आकर्षित केलं आहे. गेल्या महिन्यात, कंपनीने सेमीकंडक्टरच्या कमतरतेच्या दरम्यान लॉन्चच्या केवळ 13 दिवसांत केरेन्सच्या 5300 युनिट्सची विक्री केली.

Kia Carens ची स्टार्टींग प्राईस ही 8.99 लाख (Ex-showroom) ठेवण्यात आली आहे. त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 16.99 लाख (Ex-showroom) आहे. हे पाच ट्रिम्स प्रीमियम, प्रेस्टीज, प्रेस्टीज प्लस, लक्झरी आणि लक्झरी प्लस मल्टिपल पॉवरट्रेन आणि सीटिंग ऑप्शनसह येत आहे.

Kia Carens सोबत 6 एअरबॅग :-

Carens अनेक जबरदस्त फीचर्सनी सुसज्ज आहे. यात 10.25 – इंचाचा एचडी टचस्क्रीन डिस्प्ले, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, बोस साउंड सिस्टम, एअर प्युरिफायर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट आणि सनरूफ देखील आहे. यासोबतच सुरक्षेच्या दृष्टीने यात व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, रिअर पार्किंग सेन्सर, डाउनहिल ब्रेकिंग कंट्रोल, ऑल-व्हील डिस्क ब्रेक, ब्रेक असिस्ट यांचा समावेश आहे. Kia ने सहा आणि सात सीटर लेआउटसह Carence ऑफर केली आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीनेही कार मजबूत करण्यात आली असून या MPV सोबत 6 एअरबॅग्ज आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम यांसारखे शानदार फीचर्स देण्यात आले आहेत.

Carence ची थेट Ertiga आणि Innova Christa शी स्पर्धा :-

Kia Carens तीन इंजिन ऑप्शनसह येते. यामध्ये 1.5-लीटर नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल मोटर, 1.4-लीटर टर्बो पेट्रोल युनिट आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन समाविष्ट आहे. त्याचे 1.5-लिटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन 115hp पॉवर आणि 144Nm टॉर्क निर्माण करते, तर 1.4-लिटर, चार-सिलेंडर, टर्बो-चार्ज केलेले इंजिन 140hp पॉवर आणि 242Nm टॉर्क निर्माण करते. 1.5-लिटर, चार-सिलेंडर डिझेल इंजिन 115hp पॉवर आणि 250Nm पीक टॉर्क निर्माण करते.

कंपनीने या तीन इंजिनांसह नेहमीचा 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिला आहे, तर टर्बो-पेट्रोल आणि ऑइल बर्नर इंजिनसह ऑप्शनमध्ये अनुक्रमे 7-स्पीड DCT आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

भारतीय बाजारपेठेत Carence ची थेट स्पर्धा ग्राहकांच्या आवडत्या मारुती सुझुकी एर्टिगा (Maruti Suzuki Artiga)आणि टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (Toyota Innova Christa) यांच्याशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.