शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे. यासाठी राज्यातील जवळपास 22 लाख 60 हजार शेतकरी पात्र आहेत. यातील 8.29 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे, ज्या शेतकऱ्यांनी E-KYC त्या शेतकऱ्याच्या संबंधित शेतकऱ्यांना खात्यावर अनुदानही जमा झाले आहे.
त्यानंतर ज्या जिल्ह्यातील गावांत ग्रामपंचायत इलेक्शन नव्हतं त्या – त्या गावांतील लाभार्थ्यांची दुसरी यादीही जाहीर करण्यात आली होती. परंतु आता राज्यातील 10 लाख शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर झाली असून त्यांचे आधार प्रमाणिकरणाची मोहीम सुरु होणार आहे. यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच अनुदानाची रक्कम वर्ग होणार आहे.
राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ दिल्याने जे नियमित कर्ज परतफेड करतात अशा शेतकऱ्यांत नाराजी पसरली होती. शासनाने शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळीपूर्वी प्रोत्साहन अनुदान वितरण करण्याचा निर्णय घेतला.
या अंतर्गत सांगली जिल्ह्यात यासाठी 1 लाख 60 हजार 795 शेतकरी यासाठी पात्र ठरले आहेत. यातील 62 हजार 642 शेतकऱ्यांची पहिली यादी 13 नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आली. या शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरणाची मुदत देण्यात आली. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रोत्साहन अनुदान उर्वरीत जमा करण्यात आल दिवाळीनंतर शेतकऱ्यांची यादी जाहीर होणे अपक्षित होते, मात्र काही दिवसात ग्रामपंचायत निवडणुक जाहीर झाल्यामुळे आचारसंहितेतही यादी रखडली.
चार दिवसापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे दुसऱ्या यादीकडे लागले होते. शासनाने शनिवारी ही जिल्ह्यातील 25,102 शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात जिल्हा बँकेचे तब्बल 23 हजार 63 शेतकरी सभासद आहे. उर्वरीत अन्य बँकांतील शेतकरी आहेत.
या शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने लवकरच आधार प्रमाणिकरणाची मुदत दिली जाईल. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होणार आह. दोन्ही यादीत मिळून जिल्ह्यातील पात्र 87 हजार 744 शेतकऱ्यांची नावे जाहीर झाली आहेत. पुढच्या यादीत उवरीत 73 हजार 51 शेतकऱ्यांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.
आपलं नाव चेक करण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर CSC सेंटर गाठून आपली E-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
शेतकऱ्यांना 3 टप्प्यांत मिळणार प्रोत्साहनपर अनुदान..
शेतकऱ्यांची पहिली यादी – 8.29 लाख
अनुदान रक्कम – 4,000 कोटी
शेतकऱ्यांची दुसरी यादी – 10 लाख
अनुदान रक्कम – 5,000 कोटी
शेतकऱ्यांची तिसरी यादी – 4.85 लाख
अनुदान रक्कम – 1,200 कोटी