जमीन खरेदी विक्री असेल, बेनामी संपत्ती असेल किंवा जमिनीच्या कागदपत्रांमध्ये केले जाणारे घोटाळे असतील यामुळे सामान्य नागरिक नेहमीच चिंतेत असतो. यावर नियंत्रण मिळवता यावे यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी प्रयत्न केले जातात.
त्याच संदर्भात आणखी एक मोठे पाऊल उचलत प्रशासनाने सातबाऱ्यामध्ये काही नवीन बदल केले आहेत ज्यामुळे तुमचे जमिनी संदर्भातले डॉक्युमेंट्स अधिक सिक्योर होणार आहेत. यासाठी शासनाने राज्यामध्ये ULPIN योजना राबवण्यासाठी मंजुरी दिली आहे
मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या जमिनीचा सातबारा आणि प्रॉपर्टीचे मालमत्ता पत्र नवीन स्वरूपामध्ये 11 अंकी ULPIN सह उपलब्ध करून दिले जाणार आहे. आणि याच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज 30 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आहे.राज्यामध्ये ULPIN योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार प्रॉपर्टी व सातबाऱ्यावरती ULPIN देण्यात आलेला आहे. आता सातबाऱ्यावर ही अपडेट व्हायला सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमी वरती आता यापुढे उपलब्ध सातबाऱ्यावर ULPIN उपलब्ध करून देण्यासाठी आज 30 नोव्हेंबर 2022 रोजी शासन निर्णय घेऊन महसुली प्राधिकारी, अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
कसा असेल नवा सातबारा :-
सातबारा व मिळकत पत्रिका यांच्या दर्शनी भागावरती ULPIN अर्थात अद्वितीय भूभाग क्रमांक दर्शवणे बाबत शासननिर्णयामध्ये सर्व महसूल प्राधिकारी अधिकारी तसेच संबंधित यंत्रणाला ही सूचना देण्यात आलेली आहे की, जे काही नवीन सातबारा आणि प्रॉपर्टी कार्ड दिले जाते याच्यामध्ये सातबारा साठी गट क्रमांक व उपविभाग हे दर्शवण्याच्या पूर्वी त्याच ओळीमध्ये सुरुवातीला ULPIN दर्शवण्यात यावा आणि ULPIN संबंधित क्यूआर कोड सुद्धा सातबाऱ्यावरती उजव्या कोपऱ्यामध्ये दर्शवण्यात यावा. आणि त्या कोडच्या खाली छोट्या अक्षरांमध्ये ULPIN दर्शवण्यात यावा अशा प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे.
सुविधेसाठी याच्यासोबत एक नमुना देखील जोडण्यात आलेला आहे ज्याच्या माध्यमातून सातबारा कसा दिसेल याची माहिती आपण घेऊ शकतो. प्रॉपर्टी कार्ड किंवा मिळकत पत्रिका असतील या पत्रिकेच्या दर्शनी भागाच्या शीर्ष ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह असेल. ULPIN क्रमांक हा मिळकत पत्रिकेच्या प्रथम ओळीच्या डावीकडे आणि त्याच मिळकत पत्रिकेवरती उजव्या कोपऱ्यावरती क्यूआर कोड आणि ULPIN असावा अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
असा हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण maharashtr.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. आता या बदलामुळे चुकीच्या पद्धतीने खरेदी विक्री असेल किंवा बेनामी मालमत्ता असतील याच्यावरती कुठेतरी नियंत्रण आणता येणार आहे. आणि भविष्यामध्ये हे यूएलपीन आधार कार्डशी सुद्धा जोडले जाऊ शकते.
7/12 – 8A उतारा ऑनलाईन कसा पहायचा अन् डाउनलोड कसा करायचा ? ते पाहूया….
1. महाभूलेख होमपेजवर जा…
7/12 उताडा रेकॉर्ड काढण्यासाठी सर्वप्रथम Bhulekh Mahabhumi च्या वेब पोर्टलवर जायचं आहे. कारण mahabhulekh maharashtra वेब पोर्टल स्थलांतरित झाले आहे.
गुगलवर bhulekh.mahabhumi.gov.in हे सर्च करून तुम्ही नवीन भुलेख महाभूमीच्या वेब पोर्टलवर जाऊ शकता. किंवा तुम्ही येथून थेट नवीन वेब पोर्टल उघडू शकता – Click Here
2. विभाग निवडा.
महाराष्ट्र भूमि अभिलेख वेब पोर्टल स्क्रीनवर उघडताच उजव्या बाजूला ‘विभाग निवडा’ हा ऑप्शन दिसेल. सर्व प्रथम तुमचा विभाग निवडा आणि Go पर्यायावर क्लिक करा.
3. 7/12 रेकॉर्ड निवडा.
विभाग निवडल्यानंतर, स्क्रीनवर 7/12 आणि 8A रेकॉर्डचा पर्याय दिसेल. त्यात 7/12 निवडा. यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. स्क्रीनशॉटमध्ये दाखवल्याप्रमाणे…
4. सर्वे नंबर / गट नंबर निवडा.
यानंतर तुम्हाला 7-12 रेकॉर्ड शोधण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन दिसतील. या सर्व ऑप्शनद्वारे, आपण सात 7/12 रेकॉर्ड मिळवू शकता. त्यातील सर्व्हे नंबर / गट नंबरचा ऑप्शन निवडा. त्यानंतर तुमच्या जमिनीचा सर्व्हे नंबर / गट नंबर भरा आणि ‘शोधा’ ऑप्शनवर क्लिक करा.
5. 7/12 ऑप्शनला निवडा.
आता, सर्वप्रथम तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाका. त्यानंतर ‘7/12 पहा’ ऑप्शनवर क्लिक करा. स्क्रीन शॉटमध्ये दाखवल्याप्रमाणे…
6. Captcha Code verify करा.
पुढील स्टेपमध्ये Captcha Code verify करायचा आहे, यामुळे स्क्रीनवर दिलेला Code दिलेल्या बॉक्समध्ये भरा. त्यानंतर Verify Captcha To View 7/12 निवडा…
7. गाव नमुना सात पहा.
तुम्ही Captcha Code टाकून व्हेरीफाईड करताच, 7/12 रेकॉर्ड स्क्रीनवर उघडेल. यामध्ये पहिल्या गावाच्या नमुन्यात सात नोंदी मिळणार आहेत. त्यात दिलेले तपशील तुम्ही तपासू शकता…
8. गाव नमुना बारा पहा.
गाव नमुना सात खाली गाव नमुना बारा रेकॉर्ड देखील उपलब्ध असतील. त्यात दिलेले रेकॉर्डही तुम्ही तपासू शकता. तुम्हाला महाराष्ट्र जमीन कर हक्क नोंदींचे संपूर्ण तपशील मिळतील…
9. महाभूमि अभिलेख 7/12 Download करा।
तुम्ही तुमच्या जमिनीचे 7-12 उत्ता रेकॉर्ड डाउनलोड / प्रिंट देखील करू शकता. यासाठी ब्राउझर मेनूमधील प्रिंट ऑप्शन निवडा. त्यानंतर तुम्ही ते डाउनलोड किंवा प्रिंट काढू शकता…
अशा प्रकारे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील रहिवासी त्यांच्या जमिनीच्या 7-12 नोंदी ऑनलाईन मिळवू शकतात. सर्व्हे नंबर / ग्रुप नंबर व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या नावावर सात बार रेकॉर्ड देखील मिळवू शकता….