आज शेती व्यवसाय करणाऱ्यांचा दुग्ध व्यवसाय केवळ जोडधंदा राहिलेला नाहीये तर तो काही शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय झाला आहे. दुधाची मागणी अगदी खेड्यांपासून शहरांपर्यंत असते. दूध आणि दुधाच्या पदार्थांच्या वाढत्या मागणीमुळे गावातील लोक आता पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायातून चांगला नफा कमावत आहेत. दुग्धव्यवसायातील भविष्य सुरक्षित दिसत असल्यामुळे आता अनेक तरुण नोकरी सोडून या व्यवसायात सहभागी होताना दिसत आहेत.

यापुढे जाऊन शासन देखील या व्यवसायात उतरू पाहणाऱ्यांना आर्थिक मदत करत आहे. केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या स्तरावर दुग्धव्यवसायासाठी कर्ज आणि अनुदानाची व्यवस्था करत असले तरी आता देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) देखील दुग्ध व्यवसायात योगदान देण्यासाठी पुढे येत आहे.

ही बँक आता शेतकरी-पशुपालक आणि तरुणांना दुग्ध व्यवसायासाठी विना तारण कर्ज देत आहे, म्हणजेच आता तुम्हाला कोणतीही वस्तू गहाण न ठेवता बँकेतून पैसे उभे करता येतील आणि स्वतःचा दुग्ध व्यवसाय नव्या उंचीवर नेता येईल. या योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी, खाली दिलेला तपशील वाचा.

कसे उभे कराल दुग्ध व्यवसायासाठी कर्ज

स्टेट बँक ऑफ इंडिया अनेक श्रेणींमध्ये आपले कर्ज वितरित करते. यामध्ये दूध संकलनापासून ते इमारतीचे बांधकाम, स्वयंचलित दूध यंत्र, दूध संकलन यंत्रणा आणि दूध वाहतुकीसाठी वाहन खरेदी करण्यापर्यंत कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते. दुग्ध व्यवसायासाठी कर्जावरील व्याजदर 10.85 टक्क्यांपासून सुरू होऊन 24 टक्क्यांपर्यंत आहे. कर्जाची रक्कम, किती काळासाठी कर्ज घ्यायचे आहे, त्यानुसार व्याजदर दिला जातो हे सर्वस्वी शेतकरी किंवा पशुपालकावर अवलंबून आहे.

या कामांसाठी कर्ज होणार उपलब्ध :-

दुग्ध व्यवसायात दूध संकलन, प्रक्रिया, साठवणूक आणि वाहतूक अशी अनेक कामे करावी लागतात. स्टेट बँक ऑफ इंडिया या सर्व उद्देशांसाठी वेगवेगळ्या व्याजदरात कर्जाची सुविधा देखील प्रदान करते. उदाहरणार्थ, स्वयंचलित दूध संकलन सिस्टीमसाठी 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. दुग्धव्यवसायासाठी गोठा बांधण्यासाठी 2 लाख रुपये, दुधाच्या शीतगृहासाठी 4 लाख रुपये आणि दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या दुधाच्या टाकीसाठी 3 लाख रुपयांपर्यंत कर्जाची तरतूद आहे. आता हे शेतकरी आणि पशुपालकांवर अवलंबून आहे की ते 6 महिने कालावधीसाठी किंवा 5 लाखांपर्यंतच्या कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकतात.

शासनाकडूनही मिळवा अनुदान :-

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यतिरिक्त, अनेक सहकारी बँका व नाबार्ड देखील दुग्ध व्यवसायासाठी कर्ज देत आहेत, ज्यावर या संस्था मोठ्या प्रमाणावर अनुदान देखील देतात. याशिवाय केंद्र सरकारने डेअरी उद्योजकता विकास योजनाही चालवली आहे. या योजनेंतर्गत 10 दुभत्या जनावरांसह दुग्धव्यवसाय करायचा असेल तर दुग्ध व्यवसाय करण्यासाठी 7 लाखांचं कर्ज देते.

यामध्ये सरकार 25 टक्क्यांपर्यंत अनुदान देते, तर आरक्षित कोट्यातील लाभार्थींना 33 टक्के अनुदान दिले जाते. अधिक माहितीसाठी तुम्ही नॅशनल बँक फॉर अँग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) किंवा पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाशीही संपर्क साधू शकता..

शासकीय अनुदान मिळणाऱ्या डेअरी उद्योगाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी :- इथे क्लिक करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *