इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप (EV Startup) कंपनी Oben EV ने या वर्षी आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आणि तिची किंमत फक्त 99,999 रुपये ठेवण्यात आली आहे. आता कंपनीने त्याच्या डिलिव्हरीची माहिती शेअर केली आहे. या इलेक्ट्रिक बाइकची डिलिव्हरी जानेवारी 2023 मध्ये सुरू होणार असल्याचं सांगितलं आहे.

एक आश्चर्यकारक बाब म्हणजे आतापर्यंत या इलेक्ट्रिक बाईकला 17,000 हून अधिक बुकिंग मिळालं आहे. ही बाईक पूर्ण चार्ज केल्यावर 200 किलोमीटर पर्यंत रेंज देण्यास सक्षम असणार आहे.

ओबेन रोर (Oben Rorr) इलेक्ट्रिक बाईक सुरुवातीला भारतातील 9 शहरांमध्ये डिलिव्हरी केली जाणार आहे. यामध्ये बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत, जयपूर आणि नवी दिल्ली यांचा समावेश आहे. जर तुम्ही या शहरांमध्ये राहत नसाल तर तुम्हाला या इलेक्ट्रिक बाइकसाठी थोडी वाट पहावी लागणार आहे.

फुल चार्ज मध्ये मिळणार 200Km पर्यंत रेंज..

ही इलेक्ट्रिक बाइकला 4.4 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. हा बॅटरी पॅक 13.4 bhp पॉवर आणि 62Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यासह, कंपनीचा दावा आहे की, ती पूर्ण चार्ज केल्यानंतर 200 किमीची रेंज देते. ओबेरॉन रोहर इलेक्ट्रिक बाईक केवळ 3 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग गाठते. या इलेक्ट्रिक बाइकचा टॉप स्पीड 100 किमी प्रतितास आहे.

Oben Rorr चे फीचर्स

ओबेन रॉर इलेक्ट्रिक बाईक नेव्हिगेशन, टेलिफोनी, व्हीकल डायग्नोस्टिक्स, कनेक्टेड टेक्नॉलॉजी आणि ड्रायव्हर अलर्ट सिस्टम यासह अनेक फीचर्ससह येते. हे तीन मोडसह सुसज्ज असणार आहे. ज्यामध्ये तिची रेंज हॅव्होक मोडमध्ये 100 किमी, सिटी मोडमध्ये 120 किमी आणि इको मोडमध्ये 150 किमी असेल. या इलेक्ट्रिक बाइकची थेट स्पर्धा रिव्हॉल्ट आरव्ही 400 (Revolt RV400) तसेच ओला एस1 आणि एथर इलेक्ट्रिकशी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *