7th Pay Commission : गुड न्यूज ! नव्या वर्षात कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट, जानेवारीपासून 42% महागाई भत्ता होणार लागू, पहा डिटेल्स..
केंद्रीय कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे, 2023 च्या सुरुवातीलाचं त्यांना महागाई भत्त्याचं मोठं गिफ्ट मिळणार आहे. महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढणार आहे. मार्चमध्ये त्याची घोषणा होणार आहे. परंतु, तो जानेवारी 2023 पासूनच लागू केल्याचं मानलं जाणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 38 टक्के महागाई भत्ता (DA) दिला जात आहे. AICPI निर्देशांकाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. जुलै ते ऑक्टोबर 2022 पर्यंत औद्योगिक कामगारांच्या महागाईचे आकडे सातत्याने वाढले आहेत.
DA मध्ये किती होणार वाढ ?
पुढील वर्षाची घोषणा मार्च 2023 मध्ये होईल. पण, महागाई भत्त्याचे मूल्यांकन डिसेंबरनंतर स्पष्ट होणार आहे. सध्या ऑक्टोबरपर्यंतची आकडेवारी समोर आहे. यामध्ये औद्योगिक कामगारांच्या महागाईचा आकडा 1.2 अंकांनी वाढला आहे.
ऑक्टोबरमध्ये अखिल भारतीय CPI-IW ची संख्या 132.5 अंकांवर होती. दर महिन्याच्या दरानुसार त्यात 0.91% वाढ झाली आहे. लेबर ब्युरोने 317 मार्केटमधून रिटेल प्राईस मिळवल्या आहेत. यामध्ये 88 औद्योगिक केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.
कुठे – कुठे वाढली महागाई ?
1- अन्न आणि पेय पदार्थांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. यामध्ये 2 अंकांची वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये हा आकडा 131.9 अंक होता, तर ऑक्टोबरमध्ये तो 133.9 अंकांवर राहिला.
2- यानंतर पान, सुपारी, तंबाखूजन्य पदार्थांची महागाई वाढली आहे. सप्टेंबरमध्ये हा आकडा 147.4 होता, जो ऑक्टोबरमध्ये 148.5 होता. यामध्ये 1.2 अंकांची वाढ झाली आहे.
३- कपडे आणि चप्पलांच्या बबतीतही किंचित वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये हा आकडा 129.7 होता, तो ऑक्टोबरमध्ये 131.9 वर पोहोचला आहे. त्यात 2.2 अंकांची वाढ झाली.
4- घरांच्या बाबतीत कोणताही बदल झालेला नाही. सप्टेंबरमध्ये हा आकडा 121.0 वर होता, जो ऑक्टोबरमध्ये समान राहिला आहे.
5- इंधन आणि लाइटच्या महागाईत कोणतीही वाढ झालेली नाही. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये हा आकडा 177.8 अंकांवर होता.
6 – विविध महागाईच्या बाबतीत किंचित वाढ दिसून आली आहे. ती 127.5 वरून 128.4 पर्यंत वाढली आहे.
7- समूह निर्देशांक ऑक्टोबरमध्ये 132.5 अंकांवर राहिला, जो सप्टेंबरमध्ये 131.3 अंकांवर होता.
महागाई भत्त्यात होणार 4 टक्क्यांनी वाढ..
7 व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत महागाई भत्त्याचा मागोवा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, जुलै 2023 च्या महागाई भत्त्यामध्ये (DA वाढ) 4% ने वाढ होऊ शकते हे जुलैपासून दिसलेल्या प्रकारावरून स्पष्ट होते.
त्यामुळे महागाई भत्ता 42 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 पासून लाभ मिळणार आहे. मात्र, मार्च 2023 मध्ये होळीनंतर याची घोषणा केली जाईल. 4% वाढीसह कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा एकूण 720 रुपयांची वाढ होणार आहे. त्याच वेळी, कमाल वेतन श्रेणीसाठी ही वाढ दरमहा 2276 रुपये असणार आहे.