महाराष्ट्रातील दळणवळणाचा मार्ग सुकर करणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक उत्सुक आहे. लवकरच ही संधी सर्वसामान्यांसाठी उपलबद्ध होणार आहे.

कारण लवकरच या महामार्गावर धावण्यासाठी एसटी बस सज्ज होणार आहे. गुरुवारी 15 डिसेंबरपासून एसटीची ही विशेष प्रवासी बस समृद्धी महामार्गावरून रोज नागपूरहून शिर्डीकडे प्रस्थान करणार आहे.

रविवारी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण झाले आणि मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी या मार्गाचा वापरही सुरू केला. खासगी प्रवासी बसच्या संचालक तर या महामार्गामुळे भलत्याच खुशीत आहेत. कारण जेथे एका खासगी बसला नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी 7 ते 9 तास लागायचे ते अंतर केवळ 5 तासांत पूर्ण होणार आहे.

त्यामुळे वेळ, डिझेल आणि त्यावर होणारा हजारोंचा खर्च आता वाचणार आहे. अर्थात याचा फायदा ट्रॅव्हल्सच्या मालकांनाच होणार आहे. तर वेळ वाचणार म्हणून प्रवासीही या ट्रॅव्हल्सकडे धाव घेणार हे नक्की.

हा एकूणच सगळा जमा खर्च अन् होणार नफा लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळानेही या मार्गावर आपली बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, १५ डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी ही बससेवा सुरू होत आहे.

कसं असणार वेळापत्रक ?

ही बस रोज रात्री ९ वाजता गणेशपेठ बसस्थानकावरून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता तिचे शिर्डीत आगमन होईल. अशाच प्रकारे दररोज रात्री ९ वाजता शिर्डीतून एक बस नागपूरकडे प्रस्थान करेल जी दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता गणेशपेठ बसस्थानकावर पोहचेल.

किती आहे प्रवासभाडे ?

समृद्धी महामार्गावरील टोल आणि इतर खर्च लक्षात घेऊन या बसचे भाडे प्रतिव्यक्ती १३०० रुपये ठेवण्यात आले आहे. या बसमध्ये ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रवाशाला मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे तर, ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना तिकिटाची अर्धीच रक्कम द्यावी लागेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

प्रवास असणार आरामदायक :-

महत्वाचे म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची ही बस आरामदायक, स्लिपरकोच असणार आहे. त्यामुळे रात्रीचे जेवण करून बसमध्ये बसले की छान झोप घेऊन प्रवाशांना भल्या पहाटे शिर्डीत पोहचता येईल. ही बस रस्त्यात कुठेही थांबणार नसल्याने यात प्रवशांना कसलाही व्यत्यय येणार नाही याची काळजी राज्य परिवहन महामंडळाकडून घेण्यात येणार आहे.

येथे आहे नाके..

वायफळ, सेलडोह, वडगाव बक्षी, येळकेली, विरुल, धामणगाव (आसेगाव), गावनेर तळेगाव ( शिवनी ), कारंजा लाड, शेलू बाजार / वनोजा, मालेगाव, मेहकर, दुसरबीड,सिंदखेडराजा निधोणा, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव, घायगाव, जावरगाव , कोकमठाम..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *