भारतात राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्गांसह सर्व प्रकारचे महामार्ग सातत्याने सुधारले जात आहेत. याचा जनतेलाही मोठा फायदा झाला आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सोशल मीडियावर माहिती देण्यात आली आहे की, भारत माला प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत देशात आतापर्यंत 34,800 किमीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्ग यांचा समावेश आहे.
भारतमाला प्रकल्पांतर्गत, सरकारने 9,000 किलोमीटरचे आर्थिक कॉरिडॉर, 6,000 किलोमीटरचे इंटर कॉरिडॉर आणि फीडर रस्ते, 5,000 किलोमीटरचे राष्ट्रीय कॉरिडॉर, 4,000 किलोमीटरचे कनेक्टिव्हिटी रस्ते, 800 किलोमीटरचे द्रुतगती मार्ग आणि 10,000 किलोमीटरचे इतर राष्ट्रीय महामार्ग तयार केले जाणार असून काहींचे काम प्रगतीपथावर आहे.
प्रकल्पांतर्गत, सरकारने 27 ग्रीनफील्ड एक्स्प्रेसवे आणि प्रवेश नियंत्रित कॉरिडॉर बांधले असून ते तयार करण्यासाठी सुमारे चार लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत. हे सर्व 15 राज्यांतील 130 हून अधिक जिल्ह्यांमध्ये हे तयार करण्यात येणार आहे.
यामध्येच आपल्या राज्यात बांधला जाणारा पुणे-नगर-औरंगाबाद ग्रीन फील्ड एक्सप्रेस- वे. याबाबत सध्या पुणे – औरंगाबाद जिल्ह्यात आराखडा व भूसंपादनाचे काम सुरु असून गावाच्या नावाचं व तसेच शासन राजपञक जाहीर करण्यात आलं आहे. परंतु अहमदनगर जिल्ह्याबाबत अजून काहीही अपडेट आलं नव्हतं..
तर आता याबाबत अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी मोठी माहिती दिली आहे. या एक्सप्रेस – वे साठी आता महसूल विभागाच्या भूसंपादन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत.
त्यामुळे येत्या 15 दिवसांत अहमदनगर जिल्ह्याचीही अधिसूचना जारी होणार असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्यक्षात भूसंपादन मोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
हा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस – वे पुढच्या तीन वर्षातचं पूर्ण करण्याचं टार्गेट असून यामुळे औरंगाबाद – नगरकरांचा पुण्याचा प्रवास सुखकर होणार आहे.
कोणत्या तालुक्यासाठी कोणते भूसंपादन अधिकारी :-
नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे, पारनेर, नगर, पाथर्डी शेवगाव मार्गे हा महामार्ग औरंगाबादमध्ये प्रवेश करेल. यातील श्रीगोंदा तालुक्यात भूसंपदासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पारनेर तालुक्यात भूसंपादनासाठी पारनेर प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नगर तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर पाथर्डीसाठी तालुक्यात पाथर्डी प्रांताधिकाऱ्यांची निवड शेवगाव तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत डिसेंबर एंडिंगपर्यंत अधिसूचना जरी होऊन प्रत्यक्ष भूसंपादनाला जानेवारीमध्ये सुरुवात होणार आहे.