केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नवीन वर्षाची सुरुवात नव्या डीए (DA) वाढीने होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2023 मध्ये वाढणार आहे. नवंवर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना जॅकपॉट मिळणार आहे.
कारण, यावेळी त्यांचा महागाई भत्ता (DA) 4 टक्क्यांनी वाढणार आहे. या नव्या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्क्यांवर पोहोचणार आहे. सध्या त्यांना 38% दराने मोबदला दिला जात आहे. मात्र, मार्चमध्ये DA वाढीची घोषणा केली जाणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याची घोषणा होण्याचे संकेत मिळाले आहे.
तारीख झाली कन्फर्म :-
2023 मध्ये, पहिली DA वाढ मार्चमध्ये होणार आहे. कर्मचाऱ्यांना हे गिफ्ट होळीच्या (Holi 2023) आधी मिळेल. 1 मार्च 2023 रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याची घोषणा केली जाणार आहे. कारण, मार्च महिन्यात पहिला बुधवार पडतो आणि पुढचा बुधवार 8 मार्च असतो. पण, 8 मार्चला होळी आहे, त्यामुळे होळीपूर्वी सरकार कर्मचाऱ्यांना गिफ्ट देईल, अशी अपेक्षा आहे. आत्तापर्यंत आलेल्या औद्योगिक महागाईच्या आकड्यांवरून डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांना मिळणारा DA 42 टक्क्यांपर्यंत वाढेल.
नवीन वर्षात फिटमेंट फॅक्टरवरही होणार चर्चा..
नवीन वर्षात फिटमेंट फॅक्टरवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. याचे कारण सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी वेगळा कार्यक्रम करण्याच्या तयारीत आहे. यासाठी सरकारला या कार्यक्रमाचा मसुदा 2024 पूर्वी तयार करायचा आहे. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट देण्याचे नियोजन आखत आहे.
यामध्ये फिटमेंट फॅक्टरच्या रिव्हिजनवरही चर्चा होणार आहे. परंतु, वेतन आयोगाच्या स्थापनेनुसार, फिटमेंटची पुनरावृत्ती केली जाते. पण, वेतन आयोगाऐवजी अन्य मार्गाने त्यांचे पैसे वाढवण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी केवळ फिटमेंट वाढवून स्वयंचलित वेतन पुनरावृत्तीचे सूत्र तयार केलं जाण्याची शक्यता आहे.
महागाई भत्त्यातूनच होणार वेतन सुधारणा (Salary Revision)
सरकारचा एक पैलू असा आहे की, पगारवाढ केवळ वेतन सुधारणेसाठी DA सूत्रानुसार दिली जावी म्हणजेच महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे त्यांचा पगार वाढतच गेला. वेतन आयोगाची गरज संपुष्टात आणण्याची योजना आहे. दरवर्षी कर्मचार्यांचे मूल्यांकन केले जावे, अशी नवीन तरतूद त्यात जोडली जाऊ शकते.
दरवर्षी खासगी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे जे हाल होतात, तेच यातून घडू शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. खुद्द सरकारी विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनीही नव्या वेतन आयोगात आपले पगार वाढणार नसून नव्या सूत्रावर काम सुरू असल्याचे नमूद केलं आहे.