प्रतीक्षाही संपली अन् संभ्रमही संपला… अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. सरकारने राज्यसभेत डीए थकबाकी अर्थात 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याबाबत लेखी माहिती दिली आहे. अर्थ मंत्रालयाने राज्यसभेत ही माहिती दिल्याने सर्व अशांवर पाणी फिरले आहे.

आता 18 महिन्यांची डीए थकबाकी मिळणार नाही. तीन हप्त्यांचे पैसे दिले जाणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे अन् तशी तरतूद नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

नाही मिळणार 18 महिन्यांची DA थकबाकी :-

18 महिन्यांची डीएची थकबाकी मिळणार नसल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. कोविड-19 कालावधीत, DA चे तीन हप्ते (1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020, 1 जानेवारी 2021) थांबवण्यात आले. यानंतर, सरकारने जुलै 2021 मध्ये महागाई भत्ता बहाल केला. मात्र, गेल्या 18 महिन्यांपासून रखडलेल्या तीन हप्त्यांचा उल्लेख केला नाही..

सरकारने 1 जुलै 2021 पासून महागाई भत्त्यात 11% वाढ केली आहे. यानंतर जुलै 2021 पासून महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28% झाला. मात्र, सध्या ते 38% आहे. परंतु, कर्मचाऱ्यांनाही 18 महिन्यांसाठी पैसे हवे होते, ज्या दरम्यान महागाई भत्ता गोठवला होता.

पेन्शनधारकांसाठीही वाईट बातमी..

अर्थ मंत्रालयाने राज्यसभेत स्पष्ट केलं की, DA थकबाकीचे पैसे डियरनेस रिलीफ पेन्शनधारकांनाही दिली जाणार नाही. तशी तरतूद नाही आणि सरकारही विचार करत नसल्याचे लेखी उत्तरात सांगण्यात आलं आहे. डीए थकबाकीच्या मागणीबाबत निवृत्ती वेतनधारकांनी गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केलं होतं. परंतु, यावर कोणताही निर्णय झाला नाही.

कर्मचारी संघटना करणार आंदोलन..

कर्मचारी संघटनेचं म्हणणं आहे की, महागाई भत्ता (DA) किंवा महागाई सवलत (DR) हा कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा अधिकार आहे. ते थांबवता येत नाही. कोरोनाच्या काळात कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. त्यांचा महागाई भत्ता (DA hike) वाढवला नाही, तरीही ते काम करत राहिले. या काळात अनेक कर्मचारी आणि पेन्शनधारकांचाही मृत्यू झाला. सरकारने या प्रकरणात इतर बाबींचाही विचार करावा. मात्र, सरकारने स्पष्ट नकार दिल्यानंतर आता संघटनांनी आंदोलनाची रणनीती आखली आहे.

सरकारने केली 34,000 कोटींची बचत..

ज्या काळात महागाई भत्ता बंद करण्यात आला त्या काळात सरकारने 34,000 कोटी रुपयांची बचत केली आहे. असा अंदाज आहे की, केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी DR आणि कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) ची एकूण थकबाकी सुमारे 34,000 कोटी रुपये आहे.

पेन्शन नियमांच्या पुनरावलोकनासाठी स्वयंसेवी संस्थांच्या स्थायी समितीच्या 32 व्या बैठकीतही, खर्च विभागाच्या (DOI) प्रतिनिधीने स्पष्ट केलं की, मागील DA-DR ची थकबाकी दिली जाणार नाही. DOI ही केंद्रीय वित्त मंत्रालयाची शाखा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *