देशात सध्या अपघातांचं प्रमाण खूप वाढलं असून अपघाताच्या बाबतीत आपण पहिल्या क्रमांकावर येतो. देशात दरवर्षी 1.5 लाख लोक मृत्यूमुखी पडतात आणि 4.5 लाख लोक रस्ते अपघातात जखमी होतात. हे प्रमाण दरदिवशी 415 मृत्यू इतकं आहे. यामध्ये आपण वापरणाऱ्या गाड्यांचीही मोठी चुकी असते. परंतु लोकं कमी मेंटेनन्स अन् जास्त मायलेजवर जातात अन् अशा गाड्या घेतात त्यांना NCAP कार टेस्टिंग मध्ये कमी रेटिंग मिळालं असतं..

देशातील सर्वात मोठी कार प्रोड्युसर कंपनी मारुती सुझुकीच्या गाड्या सध्या देशभरात मोठ्या प्राणात विकल्या जातात. यामध्ये स्विफ्टला तर NCAP टेस्टमध्ये 0 रेटिंग असलं तरी ती आत्तापर्यतची सर्वात जास्त खप असलेली कार आहे. त्यापाठोपाठ आलेल्या एस-प्रेसो, इग्निसलाही ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहे.

देशातील नेहमी टॉप 10 बेस्ट सेलिंग कारच्या लिस्टमध्ये असलेल्या या गाड्या ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये मात्र नापास झाल्या आहेत. यापैकी काहींना एक तर काहींना शून्य स्टार मिळालं आहेत. मायलेजच्या दृष्टीने या तिन्ही गाड्या परवडणाऱ्या असल्या तरी सुरक्षेच्या दृष्टीने मात्र या गाड्या चालवणे रिस्की ठरणार असे या रिपोर्टमधून दिसून येत आहे. या रिपोर्टमध्ये एस-प्रेसो, स्विफ्ट आणि इग्निसला क्रॅश टेस्टमध्ये किती रेटिंग्स मिळालं ते जाणून घेउया..

मारुती एस-प्रेसो :-

सर्वसामान्यांसाठी S-Presso ही एक बजेट कार मनाली जाते. कारण स्पष्ट आहे, या कारची एक्स-शो रूम किंमत 4.25 लाख रुपयांपासून सुरू होते. तर या वाहनात 1000cc चे इंजिन आहे. मारुती S-Presso ने 34 पैकी 20.03 गुण मिळवून अँडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन प्रकारात 1 स्टार मिळवला आहे. यामध्ये चालक आणि प्रवाशांच्या डोक्याला आणि मानेला चांगली सेफ्टी मिळते.

मात्र या कारमध्ये चालकाच्या चेस्ट साठी सेफ्टी खराब असल्याचे दिसून आलं आहे. तर लहान मुलांच्या संरक्षणासाठी, S-Presso ने 49 पैकी केवळ 3.52 गुणांसह 0 स्टार रेटिंग मिळवलं आहे.

स्विफ्ट

देशात स्विफ्ट ही तिच्या सेगमेंट व्हेरियंटमधील सर्वात लोकप्रिय कार आहे. या कारमध्ये 1.2L चे पेट्रोल इंजिन आहे. दिल्लीमध्ये स्विफ्टची एक्स-शो रूम किंमत 5.92 लाखांपासून सुरू होते, परंतु सेफ्टीच्या दृष्टीने ही कार ग्राहकांची खरोखरच घोर निराशा करते. या कारच्या क्रॅश टेस्टमध्ये चालक आणि प्रवाशांच्या डोक्याला आणि मानेला चांगली सुरक्षा प्रोव्हाइड करण्यात आली आहे.

मात्र चालकाच्या चेस्ट साईडला सुरक्षिततेचा यात अभाव दिसून आला आहे. स्विफ्टने अँडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन प्रकारात 34 पैकी फक्त 19.19 गुण मिळवलं त्यामुळे या कारला 1 स्टार मिळाला. चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन प्रकारात देखील स्विफ्टने निराश करत 49 पैकी फक्त 16.68 गुणांसह 0 स्टार रेटिंग मिळवलं आहे.

मारुती इग्निस

कार आणि एसयूव्ही दोन्हीचा फील एकाच गाडीत घ्यायचा असेल तर इग्निसमध्ये तुम्हाला हा फील मिळू शकतो. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.35 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1.2L पेट्रोल इंजिन आहे. क्रॅश टेस्टमध्ये अँडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन प्रकारात या कारला 34 पैकी फक्त 16.48 गुण मिळाले आहेत.

ज्यानुसार या कारला केवळ 1 स्टार मिळाला आहे. ड्रायव्हर आणि प्रवाश्यांच्या डोके आणि मानेचे संरक्षण ठीकठाक असले तरी चालकाच्या छातीचे संरक्षण करण्यात ही कार असमर्थ ठरली आहे. लहान मुलांच्या संरक्षणाच्या बाबतीत, बोलायचं झालं तर इग्निसला 49 पैकी केवळ 3.86 गुणांसह 0 स्टार रेटिंग मिळालं आहे.

भारतातील या लोकप्रिय गाड्यांच्या बाबतीतील हे आकडे खरंच चिंतादायक असेच आहे, यामुळे ग्राहकांनी कार घेताना आपल्या जीवाची नक्की चिंता करावी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *