2017-18 पासून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारतमाला कार्यक्रम हाती घेतला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी ‘भारतमाला प्रकल्पा’च्या पहिल्या टप्प्यांतर्गत, 5,35,000 कोटी रुपये खर्चून 34,800 किमी राष्ट्रीय महामार्ग 49-* बांधले जाणार आहे.

या अंतर्गत इकॉनॉमिक कॉरिडॉर, फीडर कॉरिडॉर आणि इंटर कॉरिडॉर, नॅशनल कॉरिडॉर, कोस्टल रोड, पोर्ट कनेक्टिव्हिटी रोड, ग्रीनफिल्ड हायवे इत्यादी बांधण्यात येणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी पुणे ते औरंगाबाद हे अंतर सव्वादोन तासांत पार करता यावे म्हणून असा मार्ग नव्याने बांधण्याची घोषणा एप्रिल 2022 मध्ये केली होती. त्यानंतर या महामार्गाचा रोड मॅप ही प्रसिद्ध झाला होता. पुणे – अहमदनगर – औरंगाबाद असा हा मार्ग असून या 3 जिल्ह्यातील 9 तालुक्यातून हा भारतमाला टप्पा -2 अंतर्गत हा महामार्ग बांधला जाणार आहे.

याबाबत भूसंपादनाची अधिसूचना 3 (A) निघाली असून, औरंगाबाद तालुक्यातील 7 तर पैठण तालुक्यातील 17 गावांतून या महामार्गासाठी भूसंपादन करावे लागणार आहे.

3 (A) अधिसूचनेअंतर्गत भूसंपादन जबाबदारी, मार्ग अंतर, गावांची नावे असतात. औरंगाबाद ते अहमदनगर ते पुणे, असा हा मार्ग आहे. भारतमाला टप्पा -2 मध्ये ग्रीनफील्डमध्ये हा मार्ग प्रस्तावित आहे.

तीन जिल्ह्यांत यासाठी भूसंपादन करावे लागणार असून, पहिल्या टप्प्यातील पुण्याकडून भूसंपादन होणार आहे. अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांतून हा मार्ग जाणार असून, या जिल्ह्यांतील भूसंपादनाची जबाबदारी कॉम्पिटेंट अँथॉरिटी फॉर लॅण्ड अँक्वायजेशन उपजिल्हाधिकाऱ्यांवर उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी अधिसूचना प्रसिद्धीस दिली आहे. भूसंपादनाची अधिसूचना निघाली असून दोन तालुक्यात भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

या गावात करावे लागणार भूसंपादन :-

औरंगाबाद तालुक्यातील पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बुद्रुक, चिंचोली, घारदोन

तर पैठण तालुक्यातील वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, बवा, वरूडी बुद्रक, पाचलगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहाँगीर, पोटगाव, सायगाव, पैठण परिसरातील भूसंपादन करावे लागणार आहे.

आज महत्त्वाची बैठक..

MSRDC चे अधिकारी नागे हे भूसंपादन प्रक्रियेबाबत आज एक महत्त्वाचीं बैठक घेणार आहेत. या आजच्या बैठकीला
NHAI, TLR, जिल्हा प्रशासनातील कर्मचाऱ्यांना देखील बोलाविण्यात आले आहे. ही बैठक भूसंपादनाची प्रक्रियेला गती देण्यासाठी महत्त्वाची राहणार असल्याचे सांगितले जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *