7 वा वेतन आयोग : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 1 नोव्हेंबरची सकाळ आणखी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. वाढती महागाई पाहता, महागाई भत्त्यात पुन्हा एकदा 4 टक्क्यांनी वाढ होणार आहे. तसं पाहिलं तर, AICPI निर्देशांकाच्या डेटामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना हे गिफ्ट मिळणार आहे. पुढील DA वाढ जानेवारी 2023 मध्ये होणार आहे.
परंतु, औद्योगिक कामगारांच्या महागाईचे आकडे पाहता महागाई भात्यामध्ये 4 टक्क्यांनी वाढ होणार हे निश्चित असल्याचे दिसत आहेत. सद्यस्थिती पाहता यात केवळ 4% वाढ होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. पण, तरीही महागाईवर लक्ष ठेवावं लागणार आहे. महागाई नियंत्रणासाठी आरबीआय सातत्याने प्रयत्न करत आहे.
4 वरून 42% होणार DA
केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील वर्षी महागाई भत्त्याची भेट मिळणार आहे. याची अंमलबजावणी जानेवारी 2023 पासून होईल. पण, मार्च 2023 मध्ये होळीच्या आसपास त्याची घोषणा केली जाईल. 4 टक्क्यांच्या वाढीसह, महागाई भत्ता 42 टक्क्यांवर पोहोचेल. किमान मूळ वेतनात दरमहा एकूण 720 रुपयांची वाढ होणार आहे. त्याच वेळी, कमाल वेतन श्रेणीसाठी दरमहा 2276 रुपये वाढतील.
वास्तविक, कामगार मंत्रालयाने अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक- औद्योगिक कामगार (AICPI) ची आकडेवारी जाहीर केली आहे. सप्टेंबरमध्ये हा आकडा 131.2 इतका होता. AICPI निर्देशांक जूनच्या तुलनेत सप्टेंबर 2022 पर्यंत एकूण 2.1 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या महिन्यातील ऑगस्टच्या तुलनेत 1.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दुसऱ्या सहामाहीसाठी होणार काउंटिंग
AICPI निर्देशांक क्रमांक दुसऱ्या सहामाहीसाठी मोजले जातील. डिसेंबर 2022 पर्यंतच्या आकडेवारीवर आधारित, जानेवारी 2023 मध्ये महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. नवीन महागाई भत्ता दरवर्षी जानेवारीपासून लागू होतो. पण, मार्चमध्ये त्याची घोषणा होते. DA दर 6 महिन्यांनी सुधारित केला जातो. पहिला जानेवारीमध्ये आणि दुसरा जुलैमध्ये लागू होतो. जून 2022 पर्यंतच्या डेटावरून जुलै 2022 साठी DA मध्ये 4 टक्क्याची वाढ होती. सध्या 38% दराने महागाई भत्ता मिळत आहे.
पगारात कसा पडणार फरक ?
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीतील किमान वेतन 18,000 रुपये आहे. याचा हिशोब केला तर…
1. कर्मचार्याचे मूळ वेतन – रु.18,000
2. नवीन महागाई भत्ता (42%) – रु.7560 / महिना
3. आतापर्यंत महागाई भत्ता (38%) – रु.6840 / महिना
4. महागाई भत्ता 7560-6840 ने वाढला = रु. 720 / महिना
5. वार्षिक पगारात वाढ 720X12 = रु. 8640
42% महागाई भत्त्यावर कमाल मूळ वेतन 56900 रुपये आहे याचा हिशोब केला तर. . .
1. कर्मचार्याचे मूळ वेतन रु 56900
2. नवीन महागाई भत्ता (42%) रु 23898 / महिना
3. आतापर्यंत महागाई भत्ता (38%) रुपये 21622 / महिना
4. किती महागाई भत्ता वाढला 23898 – 21622 = रु. 2276 / महिना
5. वार्षिक पगारात वाढ 2276 X 12 = रु. 27312