Take a fresh look at your lifestyle.

मारुतीची नंबर 1 Car CNG व्हेरियंटमध्ये लॉन्च, 30Km मायलेज, 6 एयरबॅग्ज, 360° कॅमेरासह जबरदस्त फीचर्स, पहा किंमत..

0

भारतातील आघाडीची कार निर्मिती करणारी कंपनी मारुती सुझुकीने आपल्या प्रिमियम हॅचबॅक कार बलेनोचे सीएनजी मॉडेल लॉन्च केले आहे.एक्सट्रा सीएनजी किट वगळता या कारमध्ये इतर कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. बलेनो ही तिच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी प्रीमियम हॅचबॅक कार आहे. या कारचे फेसलिफ्ट मॉडेल काही काळापूर्वी लॉन्च करण्यात आले आहे आणि तेव्हापासून त्याची विक्री सातत्याने वाढत आहे. चला जाणून घेऊया बलेनो CNG बद्दल..

किती आहे किंमत ?

मारुती सुझुकीने बलेनो सीएनजी दोन व्हेरिएन्ट मध्ये लॉन्च केली आहे. तिच्या डेल्टा व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 8.28 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, तर टॉप Zeta व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 9.21 लाख रुपये आहे.

किती असेल मायलेज ?

मारुती सुझुकी बलेनो सीएनजी मध्ये 1.2-लीटर के-सीरीज पेट्रोल इंजिन असणार आहे, जे 77.49PS पॉवर आणि 98.5Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. CNG मध्ये, नवीन बलेनो 30.61 किमी/किलो मायलेज देते. म्हणजेच, आता तुमची आवडती बलेनो अधिक परवडणारी आणि किफायतशीर कार बनली आहे.

सेक्युरिटी फीचर्स आणि स्पेस

सेक्युरिटीसाठी, या कारमध्ये 6 एअर-बॅग्ज, अँटी-हिल कंट्रोल आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम + EBD सह अनेक चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये हेड-अप डिस्प्ले, 360-व्ह्यू कॅमेरा आणि नवीन 9-इंचाचा SmartPlay Pro+ इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. यात स्टार्ट-स्टॉप बटण देखील दिले आहे.

स्पेसच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, नवीन बलेनो आपल्याला निराश करणार नाही, या कराच्या केबिनमध्ये आपल्याला लहान स्टोरेज स्पेस मिळते. कारच्या सीट्स खूपच कम्फर्टेबल आहेत. आणि मागील सीट देखील आरामदायक म्हणता येतील असेच आहेत. लांबच्या प्रवासात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही असे कंपनीचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.