देशातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. देश-विदेशात सोयाबीनची वाढती मागणी आणि सोयाबीनचे कमी उत्पादन यामुळे देशातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ होताना दिसत आहे.
खरीपाचे मुख्य पीक सोयाबीन, सरकारने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा (एमएसपी) जास्त दराने बाजारात विकले जात आहे. वर्ष 2022-23 साठी, सरकारने सोयाबीनचा एमएसपी 4300 रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे, तर बाजारात सोयाबीनची किंमत जवळपास 6000 ते 8000 रुपयांच्या घरात पोहोचली आहे.
अनेक वर्षांनंतर सोयाबीनच्या मालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी खुशीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचा तुटवडा असल्याने यावेळी सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
देशातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा भाव 5000 ते 8000 रुपयांपर्यंत आहे.
महाराष्ट्रातील मंडईत सोयाबीनचा भाव
महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव पुढीलप्रमाणे आहेत
अकोला मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 4700 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 6215 रुपये प्रतिक्विंटल आहे.
आष्टी मार्केटमध्ये सोयाबीनचा किमान भाव 4311 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5701 रुपये प्रति क्विंटल आहे.
भोकर मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 4380 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 6150 रुपये प्रति क्विंटल आहे.
चोपडा मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 4900 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 6150 रुपये प्रति क्विंटलपर्यंत आहे.
गंगाखेड मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 5000 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 6370 रुपये प्रति क्विंटल आहे.
नागपूर मार्केटमध्ये सोयाबीनचा किमान भाव 4200 रुपये प्रति क्विंटल आणि कमाल भाव 6080 रुपये प्रति क्विंटल आहे.
वाशिम मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 4650 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 6880 रुपये प्रति क्विंटल आहे.
नेवासा मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 5100 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5100 रुपये प्रति क्विंटल आहे.
श्रीरामपूर मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 4500 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5000 रुपये प्रति क्विंटल आहे.
कर्जत (अहमहदनगर) मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 4500 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5500 रुपये प्रति क्विंटल आहे.
भारतात सर्वात जास्त बाजारभाव मध्य प्रदेशातील बदनगर बाजार समितीमध्ये आहे. तिथे सोयाबीनचा किमान भाव 4010 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 8000 रुपये प्रति क्विंटल आहे.
भारतातील सोयाबीन चे उत्पन्न घेणारी प्रमुख राज्ये
भारतातील सोयाबीन पिकवणारी प्रमुख राज्ये : महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, आंध्र प्रदेश आणि राजस्थान आहेत.
भारताव्यतिरिक्त अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, युक्रेन या देशांमध्ये देखील प्रामुख्याने सोयाबीनची लागवड होते.