‘या’ कंपनीच्या गाड्यांची डिमांड संपता संपेना; फक्त 30 दिवसांत विकल्या 1.43 लाख गाड्या, या Car ला मध्यमवर्गीयांची सर्वाधिक पसंती. .
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने ऑक्टोबरमधील विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. कंपनीने वार्षिक आधारावर देशांतर्गत प्रवासी वाहनांच्या विक्रीत 28.77% वाढ केली आहे. ऑक्टोबर महिन्यात कंपनीने एकूण 140,337 युनिट्सची विक्री केली.
ऑक्टोबर 2021 मध्ये कंपनीने 108,991 युनिट्सची विक्री केली होती. म्हणजेच गेल्या महिन्यात कंपनीने 31,346 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री केली. त्याच वेळी, एलसीव्ही सह कंपनीची देशांतर्गत विक्री 143,250 युनिट्सवर होती.
ऑक्टोबर 2021 मध्ये हा आकडा 112,788 युनिट्सचा होता. देशांतर्गत आणि निर्यातीसह कंपनीची एकूण विक्री 167,520 युनिट्स होती. कंपनीने मिनी, कॉम्पॅक्ट, मिड-साईज, युटिलिटी वाहने आणि हलकी व्यावसायिक वाहने अशा सर्व सेगमेंटमध्ये वाढ झाली आहे. परंतु, वेन्स सेगमेंमध्ये या कंपनीला डिग्रोथचा सामना करावा लागला आहे
मिनी आणि कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये वाढती मागणी
हॅचबॅक सेगमेंट हा नेहमीच मारुतीसाठी एक मजबूत दुवा राहिला आहे. यामध्ये अनेक मिनी आणि कॉम्पॅक्ट मॉडेल्सचा समावेश आहे. मारुतीकडे मिनी सेगमेंटमध्ये अल्टो आणि एस-प्रेसो आहेत. कंपनीने ऑक्टोबरमध्ये या दोन्ही कारच्या 24,936 युनिट्सची विक्री केली. एक वर्षापूर्वी, कंपनीने ऑक्टोबरमध्ये या सेगमेंटमध्ये 21,831 वाहनांची विक्री केली होती. दुसरीकडे, कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये बलेनो, सेलेरिओ, डी-झायर , इग्निस, स्विफ्ट, टुर – एस आणि व्हॅगनर यांचा समावेश आहे. कंपनीने ऑक्टोबर 2022 मध्ये या 7 मॉडेल्सच्या 76,685 युनिट्सची विक्री केली. ऑक्टोबर 2021 मध्ये त्याची 48,690 युनिट्सची विक्री झाली होती.
युटिलिटी व्हेईकल सेगमेंटमध्येही दिसून आली वाढ
मारुतीच्या युटिलिटी व्हेईकल सेगमेंटमध्ये ब्रेझा, एर्टिगा, एस-क्रॉस आणि एक्स एल 6 यांचा समावेश आहे. कंपनीने गेल्या महिन्यात या चार मॉडेल्सच्या 30,971 युनिट्सची विक्री केली. गेल्या वर्षी कंपनीने या सेगमेंटमध्ये 27,081 मोटारींची विक्री केली होती. सियाझ ही एकमेव कार आहे जी कंपनीकडे मिड साईझ सेगमेंटमध्ये आहे.
गेल्या महिन्यात 1,884 मोटारींची विक्री झाली. तर वर्षभरापूर्वी 1,069 युनिट्सची विक्री झाली होती. तर , व्हॅन सेगमेंटमध्ये Eeco कंपनीच्या 8,861 युनिट्सची विक्री झाली. ऑक्टोबर 2021 मध्ये हे 10,320 युनिट होती.