Take a fresh look at your lifestyle.

BREAKING : शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ‘या’ बँकांच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 50000 रु. जमा होण्यास सुरुवात, पहा डिटेल्स

0

नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या आणि प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र झालेल्या परंतु केवायसी करूनही अद्याप देखील आपल्या खात्यामध्ये 50 हजार रुपये अनुदान न आलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक अपडेट आहे. डीसीसी बँकेचे शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान अद्यापही खात्यात जमा झालं नव्हतं त्या शेतकऱ्यांना आजपासून अनुदान वाटप सुरू होणार आहे.

जे शेतकरी 2017- 18, 18 -19, 19 -20 यांपैकी दोन वर्षे नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करत आहेत अशा शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे आणि या अनुदानासंदर्भातील पहिली यादी 12 ऑक्टोबर 2022 रोजी प्रकाशित करण्यात आली.

ज्यामध्ये पाहिलं तर सर्वसाधारणपणे सर्वात जास्त शेतकरी संख्या ही डीसीसी या बँकेच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची होती. यामध्ये सर्व जिल्ह्याच्या डीसीसी बँकेचा पात्र झालेल्या शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली होती आणि परंतु ही यादी प्रकाशित केल्यानंतर आणि केवायसी झाल्यानंतर सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित केले जाणार आहे.

दिवाळीपूर्वी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतील अशी सर्व शेतकऱ्यांना खात्री होती. परंतु बऱ्याच बँकेच्या माध्यमातून तसेच काही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून देखील वाटप झाले परंतु काही दिवाळखोरीत निघालेल्या किंवा इतर काही तांत्रिक अडचणीत असलेल्या बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अनुदानाचे अद्याप देखील वाटप करण्यात आलेले नव्हते.

याच प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50 हजार रुपयांचे अनुदान आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे 50 हजार रुपयांच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

या दिरंगाईमुळे आता येणारी पुढची यादी देखील उशिरा येण्याची चिन्ह आहेत. ही यादी साधारणपणे 1 नोव्हेंबर 2022 पर्यंत येण्याची शक्यता होती परंतु आता या राहिलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान जमा झाल्यानंतर दुसरी यादी प्रकाशित होणार आहे . त्याबाबतचे अपडेट अद्याप आले नसले तरी लावरच ते जाहीर होतील त्यामुळे अपडेट आल्यानंतर आपण माहिती घेणार आहोत.

Leave A Reply

Your email address will not be published.